Imtiaz Jalil  esakal
मराठवाडा

Imtiaz Jalil : धाराशिव लोकसभा निवडणूक : धाराशिवची जागा एमआयएम लढवणार ? इम्तियाज जलील

अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दैनिक ‛सकाळ’ला दिली आहे.

शीतलकुमार शिंदे

धाराशिव : राज्यातील लोकसभा निवडणूका लढविण्यासाठी आम्ही ठरवलेल्या यादीत धाराशिवचाही समावेश आहे. धाराशिवची जागा आमच्या पक्षाकडून लढविण्यास अनेक दिग्गज इच्छुक आहेत. मात्र महायुतीसह आघाडीच्या व अन्य पक्षांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत. अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दैनिक ‛सकाळ’ला दिली आहे.

सध्या कोणतीही आघाडी किंवा युती एकत्र नसल्याचे चित्र आहे. सर्वत्र फाटाफूट दिसत आहे. याचा आम्ही कानोसा घेत आहोत. आशा परिस्थीतीत आमच्या उमेदवाराला निश्चित लाभ मिळू शकणार आहे. अशी परिस्थिती आहे. सध्या आमच्याकडे धाराशिव येथून निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यातील कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्षाच्या वरीष्ठस्तरावर होणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यातूनही कोणी इच्छुक असेल तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार नाही. पक्षाचे वरिष्ठ मंडळ याबाबतीत निर्णय घेऊन तशी घोषणा करतील. असेही जलील यांनी सांगितले आहे.

दरम्यान एमआयएमचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सिद्दीक इब्राहिम बौडीवले तथा गोलाभाई यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आपण इथून इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र पक्षाची वरिष्ठ मंडळी अंतिमतः जो उमेदवार घोषित करतील त्यासाठी सर्व ताकतीनिशी पक्षाचा प्रचार आपण करू असेही बौडीवले यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT