Dharashiv Loks sakal
मराठवाडा

Dharashiv Loksabha Result : वर्चस्व महायुतीचे, लाभ आघाडीला!

महाविकास आघाडीच्या विक्रमी मताधिक्याच्या विजयामुळे धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच आमदारांना धोक्याचा इशारा मिळाला आहे.

शीतलकुमार शिंदे

महाविकास आघाडीच्या विक्रमी मताधिक्याच्या विजयामुळे धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच आमदारांना धोक्याचा इशारा मिळाला आहे. तुळजापूरसह परंडा, उमरगा, औसा (जि. लातूर) आणि बार्शी (जि. सोलापूर) या मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मतांची लक्षवेधी आघाडी मिळवली आहे. लोकसभेच्या या मतदारसंघातील पाचही आमदार महायुतीचे आहेत, हे विशेष.

महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी देण्यात आली. त्यांची उमेदवारीही तुलनेने लवकरच घोषत झाली. तेव्हापासूनच आपणच बाजी मारू, असा आत्मविश्वास त्यांना व त्यांच्या नेत्यांना होता. निकालात ते दिसले. त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केला.

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात ओमराजेंना आघाडी मिळाली आहे. औसा (जि. लातूर) मतदारसंघात त्यांना ३४ हजार ९६६ मतांची आघाडी मिळाली. इथे त्यांना एक लाख दोन हजार २४८ मते मिळाली. अर्चना पाटल यांना ६७ हजार २८२ मते मिळाली आहेत. उमरगा मतदारसंघात ओमराजेंना ४३ हजार ९४४ मतांची आघाडी मिळाली.

त्यांना एक लाख सहा हजार ६६९, तर अर्चना पाटलांना ६२ हजार ७२५ मते मिळाली आहेत. तुळजापूर मतदारसंघात ५२ हजार १७६ मतांची आघाडी मिळविणाऱ्या ओमराजेंना एक लाख ३८ हजार ७९१, तर अर्चना पाटलांना ८६ हजार ६१५ मते मिळाली आहेत. उस्मानाबाद मतदारसंघात ६० हजार ४२३ आघाडी मिळाली असून एक लाख ३७ हजार १५८, तर अर्चना पाटलांना ७६ हजार ७३५ मते मिळाली. परंडा, बार्शी (जि. सोलापूर) मतदारसंघातही ओमराजेंबाबत असेच चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT