Mahayuti Campaign
Mahayuti Campaign sakal
मराठवाडा

Dharashiv Loksabha Election : महायुतीच्या मेळाव्यात मताधिक्याचा एल्गार! अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

अविनाश काळे

उमरगा - उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १५) सांयकाळी ओम बालाजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारास उमरगा - लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.

माजी मंत्री बसवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिहं पाटील, शिवसेनेचे माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जेष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन, राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्तेउपस्थित होते. या वेळी तिन्ही पक्षाच्या व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी बोलताना माजी खासदार गायकवाड म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारास यावेळी तन, मन, धनाने निवडून आणावं लागेल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुती उमेदवार विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करावे. तर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्यामुळे आपल्याला महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई यांना निवडून दयावे लागेल.

उमरगा - लोहारा तालुक्यातून भरपूर लीड द्यायची आहे. माझ्या राजकीय कारकीर्द मध्ये उमरगा तालुक्याने मावशीचे प्रेम दिले तर औसाने आई चे प्रेम दिले. असेही ते म्हणाले. आमदार राणा पाटील म्हणाले की, केंद्र सरकार व महायुती सरकार च्या माध्यमातून उजनी चे शास्वत  पाणी जून महिन्यात येणार आहे. यामुळे एक लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

आमदार चौगुले म्हणाले की, या लोकसभा निवडणूकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण आहे हे न पाहता महायुतीच्या उमेदवारास मतदान करून विजयी करावे. उमरगा लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्याने महायुती उमेदवारास विजयी करू. अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी जवळपास सर्वच वक्त्यांनी खासदार ओम राजे निंबाळकर यांच्यावर आपल्या भाषणातून

खासदार ओमराजेवर टीका केली. तर आकांक्षा चौगुले, हरीश डावरे सह इतर वक्त्यांनी महायुती उमेदवारस निवडून देण्याचं आवाहन केले. प्रा शौकत पटेल यांनी सूत्रसंचलन केले तर सिद्धेश्वर माने यांनी आभार मानले. या वेळी तिन्ही पक्षाचे व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान या व्यासपीठावर बसवराज पाटील, रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, संताजी चालुक्य ही मंडळी पहिल्यांदाच एकत्र दिसून आल्याने उपस्थितामध्ये कुतहुल जाणवत होते.

या वेळी जितेंद्र शिंदे, अभयराजे चालुक्य, किरण गायकवाड, मोहन पनूरे, आकांशा चौगुले, हरीश डावरे, प्रा. शिवाजीराव वडणे, राहुल पाटील, प्रकाश सुभेदार, बळीराम सुरवसे, एम.ए. सुलतान, शहाजी पाटील, माधव पवार, गोविंद पवार, राजू मिनियार, दिलीप भालेराव, प्रकाश अष्टे, शाहूराज माने आदींची उपस्थिती होती.

सुरेश बिराजदार यांनी खंत बोलून दाखविली....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद लोकसभेसाठी तयार रहा असा शब्द दिला होता. म्हणून गेल्या सहा सात महिन्यात मला मतदार संघातून प्रचंड उत्तम प्रतिसाद होता. संपूर्ण उस्मानाबाद मतदार संघ भेटीगाठी घेऊन, मिटिंग घेऊन, बैठक घेऊन  पिंजून काढला. वातावरण चांगले होते. मात्र महायुतीच्या तांत्रिक कारणामुळे थांबायला सांगितले गेले. अजित पवार यांनीच तयारीत रहा असे सांगितले होते व त्यांनीच थांबायला सांगितले. त्यामुळे आपण पक्षाची भूमिका मानणारे असल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडूण देण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT