dharashiv loksabha election sakal
मराठवाडा

Dharashiv Loksabha Election : सोमवारी ३ जणांचे झाले उमेदवारी अर्ज दाखल; २३ जणांनी घेतले ५९ उमेदवारी अर्ज

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी (ता. १५) तीन जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

शीतलकुमार शिंदे

धाराशिव - या लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी (ता. १५) तीन जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आर्यनराजे किसनराव शिंदे यांनी राष्ट्रीय समाज दल (आर), नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी (विश्व शक्ती पार्टी) आणि अर्जुन सिद्राम सलगर यांनी (अपक्ष) म्हणून नामनिर्देशितपत्र (उमेदवारी अर्ज) दाखल केले आहेत. आज २३ व्यक्तींनी ५९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दोन दिवसात (सुट्टीचे दिवस वगळून) ४१ जणांनी ९५ अर्ज घेतले आहेत. तर ३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शुक्रवार (ता. १२) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस शुक्रवारी (ता. १९) आहे. अद्याप महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले नाहीत. बुधवारी (ता. १७) रामनवमीची सुटी असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्यक्षात तीन दिवसंचाच वेळ शिल्लक राहिला आहे. या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील, महाविकास आघाडीकडून सेनेचे (उबाठा) ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर या मैदानातील उमेद्वाराणीही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. हे तिन्ही उमेदवार मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील असे सांगितले जात आहे.

अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनातून उमेदवारांचा जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असतो. या शक्तीप्रदर्शनातून प्रचाराची पुढील दिशा ठरत असते. यावेळी दिसणाऱ्या गर्दीवरूनही प्रचारातील पुढचे डावपेच आखले जात असतात. त्यामुळे उर्वरित तीन दिवसात शक्तिप्रदर्शन करत इच्छुक उमेदवार, आपापले उमेदवारी अर्ज दाखल होतील अशी चर्चा आहे.

यांनी घेतले उमेदवारी अर्ज -

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. १२) १८ जणांनी ३६ अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी आज सोमवारी (ता. १५) २३ जणांनी ५९ अर्ज घेतले आहेत. असे एकूण दोन दिवसात ४१ जणांनी ९५ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आज सोमवारी उमेदवारी अर्ज घेतलेल्या २३ जणांमध्ये श्रीराम राजाभाऊ कुलकर्णी (२), नितेश शिवाजी पवार (४), उमाजी पांडुरंग गायकवाड (४), तसलीम निजामोद्दीन काजी (४), काकासाहेब संदीपान खोत (२), ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी (४), मनोहर आनंदराव पाटील (१), अनिल शिवाजी जाधव (२), संजयकुमार भागवत वाघमारे (४), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर (४), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (४), शायनी नवनाथ जाधव (१), मयूर ज्ञानेश्वर काकडे (२), संयोजीनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर (४), वर्षा विनोद कांबळे (१), शेख नौशाद इकबाल (२), नेताजी नागनाथ गोरे (२), जमीलखा माहेबूब पठाण (४), बाळकृष्ण दाजीराम शिंदे (२), योगीराज अनंता तांबे (१), शामराव हरिभाऊ पवार (२), गजेंद्र कुंडलिक खोत (१) आणि सिद्दीक इब्राहिम बौडीवले (२) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT