धनंजय मुंडे
धनंजय मुंडे sakal
मराठवाडा

शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याचा वेगळा पॅटर्न व्हावा : मंत्री धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : बीड जिल्ह्याचा इतिहास हा कायम संघर्षाचा राहिलेला आहे. या संघर्षातून जिल्ह्याने बरचं काही मिळविलं आहे. शिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याचा वेगळा पॅटर्न निर्माण व्हावा अशी अपेक्षा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

येथील सिंदफणा अच्युवर्स अकॅडमीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बंसल क्लासेसचे उदघाटन त्यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके होते. माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगला सोळंके, बजरंग सोनवणे, सभापती अशोक डक, तहसीलदार वर्षा मनाळे, व्याख्याते अविनाश भारती, अमरनाथ खुर्पे, डॉ. बजाज, प्रा. विष्णू घुगे, रामेश्वर टवाणी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार हे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी व या भागातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बदलत्या काळामध्ये शिक्षणप्रणालीदेखील बदलली आहे. पूर्वीचे शिक्षण व पूर्वीची शिक्षण पध्दती आज राहिलेली नाही.

ध्येय व स्वप्न पूर्ण करण्याकरिता या बंसल क्लासेसचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. आमदार सोळंके म्हणाले की, या भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व परिपूर्ण शिक्षणाचे दालन सुरू करण्यात आले असून बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगार असलेली ओळख मिटविण्याचे काम जिल्ह्यातील विद्यार्थी करतील. व्याख्याते अविनाश भारती यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दहावीतील गुणवंतांचा मंगला सोळंके यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक सखाराम जोशी व अर्चना जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिंदफणा पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

Hardik Pandya: 'हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो, तो धोनीसारखा...' एबी डिविलियर्सचं MI कॅप्टनबाबत खळबळजनक भाष्य

Latest Marathi News Live Update : खडकवासला परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

Mata Ling Bhairavi Temple : भारतातल्या या मंदिरात मासिक पाळीच्या काळातही महिलांना दिला जातो प्रवेश, केवळ महिलांनाच आहे पुजेचा मान!

SCROLL FOR NEXT