file photo 
मराठवाडा

वेध लागले धुलीवंदनाचे : बहुगुणी पळस बहरला, जिंतूर तालुक्यात बच्चे कंपनी जंगलाकडे

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : अवघ्या पंधरा दिवसावर आलेल्या धुलीवंदनाचे नागरिकांना वेध लागले. या आनंदी सणात रंग तयार करण्यासाठी ग्रामीण भागात पळस फुले जमा केली जात आहेत.

जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत इत्यादी भेदभाव बाजूला सारुन सर्वसमावेशकाचे दर्शन घडवणारा धुलीवंदनाचा सण होळीच्या दुसरे दिवशी परंपरेनुसार साजरा केला जातो. पुढे रंगपंचमीपर्यंत सुरु असतो. रंगोत्सवाचा हा सण महिलांसह अबालवृध्द नागरिकांच्या आनंदाचा सण आहे. विशेषतः या दिवशी लहान मुले व तरुणाईंच्या आनंदाला उधाण येते. पूर्वी शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या टाक्यांमध्ये पाणी व विविध रंग भरुन दुपारच्या सुमारास बैलगाडीद्वारे मिरवणूक काढून पिचकारीने नागरिकांच्या अंगावर रंगाची उधळण करीत. अनेकजण चिखलफेक करीत.

कालौघात हे चित्र बदलल्याने अलीकडे रसायन मिश्रित रंगाऐवजी पळसाच्या फुलांसह वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ग्रामीण भागात आतापासूनच पळसाची फुले जमा करुन ती वाळवत आहेत. तालुक्यातील भोसी येथे ग्राम सम्रध्दी विकास कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बहुगुणी पळस बहरला 
रंगांसोबतच औषधी वनस्पती म्हणून ओळखला जाणारा तसेच रखरखत्या ऊन्हात केशरी रंगाच्या फुलांमुळे आल्हाददायी वाटणारा असा बहुगुणी पळस  तालुक्याच्या विविध भागात बहरला आहे .हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन व पोषक हवामानामुळे तालुक्याच्या उत्तरेकडील डोंगरी भागात तसेच पूर्व व पश्चिमेकडील कांही भागात पळस मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT