digital india initiative broadband technology internet facility ignore by department Esakal
मराठवाडा

Digital India : ‘डिजिटल इंडिया’चे भंगले स्वप्न; ब्रॉडबँड यंत्रणा बनली शोभेची वस्तू

माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीला जोडलेली इंटरनेट सेवा बंदच; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

पांडुरंग उगले

माजलगाव : गावाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होऊन जनतेला एका क्लिकवर पाहायला मिळावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी बसवलेली ब्रॉडबँड यंत्रणा धूळखात पडून आहे.

याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यातच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांकडूनही यंत्रणा सुरु करण्यासाठी काहीच प्रयत्न होतांना दिसत नाहीत.त्यामुळे माजलगाव तालुक्यातील बहुतांशी ठिकाणची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न ही शोभेची वस्तू बनली आहे. यासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.

ग्रामीण जनतेच्या विकासाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायती डिजिटल होव्यात, प्रशासकीय कारभार पारदर्शक होऊन तो एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, गावातील नागरिकांना वायफाय सुविधा मिळावी, दुर्गम भागातील गावाची माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्र शासनाने डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत ‘भारतनेट’ योजना राबविली.

यातून राज्यातील सर्व ग्रामपंचायतला इंटरनेट जोडणी दिली होती. ग्रामपंचायत कार्यालयात ब्रॉडबँड यंत्रणा बसवण्यासाठी अनेक कि.मी. रस्ते रस्ते खोदून केबल जोडण्यात आले होते. त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायतीत वर्ष, दोन वर्षापासून हि सुविधा सुरु करण्यात आली होती.

परंतु काही ग्रामपंचायतीपर्यंत अद्यापही हि सुविधा पोहचली नसल्याचे दिसून येत आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून शासनाने ग्रामपंचायतीमध्ये बीएसएनएलचे उपकरण बसविले.

सुरूवातीला बहुतांशी ग्रामपंचायतीत इंटरनेट सेवा सुरु झाल्यानंतर वर्षभर लाभही मिळाला. परंतु मागील वर्ष, दोन वर्षापासून बहुतांशी ग्रामपंचायतीत हे उपकरण केवळ शोभेची वस्तू म्हणून भिंतीला अडकविलेले दिसत आहे. हि सुविधा सुरु करण्यासाठी ना कंपनी, ना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ना पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे.

६१ हजार कोटीचा खर्च

‘डिजिटल इंडिया’चा नारा देत केंद्र शासनाने भारतनेट योजनेतून देशातील ग्रामपंचायत कार्यालयात ब्रॉडबँड यंत्रणा बसवली. ग्रामीण भागासह देशभरात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्यासाठी जवळपास ६१ हजार कोटीचा खर्च केला. परंतु सद्यस्थितीत बहुतांशी ग्रामपंचायत कार्यालयातील इंटरनेट सुविधेचे उपकरण धूळखात पडले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातील इंटरनेट सुविधा दोन वर्षापासून बंद आहे, ती पूर्ववत सुरु करण्यासाठी ग्रामसेवकाला सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि नागरिकांना वायफाय सुविधा देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर पाठपुरवा करून यंत्रणा सुरु करू.

— राजाभाऊ अर्जुन, सरपंच, चिंचगव्हाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT