card-paryment
card-paryment 
मराठवाडा

आता प्रवास "कॅशलेस'च्या दिशेने 

अभिजित हिरप - सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - पाचशे-हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर एटीएमवर फारच कमी रक्कम मिळत आहे. अधिक रकमेचे व्यवहार करायचे असल्यास डीडी, चेक अथवा एटीएम कार्ड स्वाईप करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांनी साठ टक्‍के बडे व्यवहार स्वाईप मशीननेच केले. मात्र, ज्यांच्याकडे हे मशीन नाहीत त्यांना व्यवसायाला मुकावे लागले. यानिमित्ताने कॅशलेस व्यवहारांकडे प्रवास सुरू झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे. 

बारा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहरात लहान-मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील एक लाखाच्या आसपास प्रतिष्ठाने आहेत. यातून किरकोळ, होलसेल सर्व व्यवहार होतात. आतापर्यंत हे व्यवहार करण्यासाठी केवळ वीस हजार प्रतिष्ठाने स्वाईप मशीन वापरात आहेत. यात प्रामुख्याने पेट्रोलपंप, इलेक्‍ट्रॉनिक, मोठी किराणा दुकाने, सराफा, कापड व्यावसायिकांकडे सरासरी तीनप्रमाणे पन्नास हजार स्वाईप मशीन (पॉईंट ऑफ सेल) कार्यान्वित आहेत. मात्र, हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर बहुतांश व्यावसायिकांचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. त्यामुळे व्यापारी व ग्राहकवर्ग खडबडून जागे झाले. त्यानंतर ग्राहकांनी एटीएम, तर व्यापाऱ्यांनी स्वाईप मशीन बसविण्यासाठी चाचपणी सुरू केली. त्यामुळे राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांमध्ये चौकशी सुरू झाली आहे. 

याबाबत एक्‍स्पर्ट ग्लोबल सोल्युशनचे हेड ऑफ सॉफ्टवेअर मिताली मिश्रा म्हणाल्या, की स्वाईप मशीनमध्ये लॅंडलाईन, वायरलेस आणि मोबी टेक्‍नॉलॉजीने वापरले जाणारे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. प्रामुख्याने लॅंडलाईन, वायरलेस आणि वायफाय तंत्रज्ञान असलेल्या स्वाईप मशीन वापराचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे तंत्रज्ञान एका ठराविक क्षेत्रापुरते वापरावयाचे असल्यास सोईस्कर आहे. त्यानंतर होम डिलीव्हरी करणाऱ्या कंपन्या मोबी टेक्‍नॉलॉजीचा वापर अधिक करतात. यामध्ये एक एक्‍स्टर्नल डिव्हाईस स्मार्टफोनशी ऍटॅच केलेला असतो. दोन्ही प्रकारांमध्ये वन टाईम गुंतवणूक असते. त्यानंतर बॅंकांचा किरकोळ चार्ज अदा करावा लागतो. मात्र, शंभरपासून लाखापर्यंतचे व्यवहार करण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टळेल, हे नक्‍की. 

स्वाईप मशीनचे फायदे 
स्वाईप मशीन लॅंडलाईन, सीमकार्ड, वायफाय आणि 
मोबी टेक्‍नॉलॉजीने जोडता येत असल्याने कुठेही वापरता येणे शक्‍य आहे. 
स्वाईप मशीनने व्यवहार करण्याची प्रक्रिया जलद होते. 
या व्यवहारांची नोंद बॅंकांकडे आपोआपच होते. 
रोख रक्‍कम काढणे, ती सांभाळणे आणि देण्याचा त्रास कमी होतो. 
व्यवहारांमध्ये सुरक्षितता येण्यास मदत होईल. 

अशी येईल तुमच्याकडे स्वाईप मशीन 
स्वाईप मशीन घेण्यासाठी संबंधित बॅंकेत तुमचे करंट खाते असणे आवश्‍यक आहे. त्यानंतर बॅंकेकडे एक विनंती अर्ज करावा लागेल. 
या विनंती अर्जांची छाननी करून बॅंकेतून तुम्हाला कन्फर्मेशन येईल. त्यानंतर यासाठी लागणारी तांत्रिक सुविधा उपलब्ध आहे अथवा नाही याची पडताळणी केली जाईल. 
सर्व पडताळण्या झाल्यानंतर स्वाईप मशीन खरेदी करण्यासाठी लागणारी रक्‍कम भरल्यानंतर एक ते दोन आठवड्यांत हे मशीन कार्यान्वित होऊ शकते. सरासरी आठ ते दहा हजार रुपयांमध्ये हे मशीन उपलब्ध होते. 
बॅंकांनुसार एक हजार रुपयांच्या व्यवहारामागे साडेआठ रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत शुल्क आकारले जातात. 
काही बॅंकांकडून स्वाईप मशीनसाठी योजनाही दिल्या जातात. या योजनांचा थेट फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. 

ही लागतील कागदपत्रे 
मर्चंट ऍप्लीकेशन 
ओळखपत्र 
रहिवासी पुरावा 
 शॉप ऍक्‍ट अथवा व्यवसायाचा पुरावा 

असा होतो व्यवहार 
आपल्याकडील डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी पॉज (पॉईंट ऑफ सेल) मशीनवर कार्ड स्वाईप करावे लागेल. त्यानंतर व्यवहाराची (देय) रक्‍कम व पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर मशीनमधून मर्चंट व कस्टमर प्रत येते. यातील मर्चंट प्रतीवर स्वाक्षरी केल्यावर कस्टमर प्रत स्वत:कडे घ्यावी. मात्र, हे करताना सुरक्षिततेची काळजी नक्‍की घ्यावी. अर्थात या व्यवहारांसाठी तुमच्या एटीएमवर मुबलक रक्‍कम असल्याशिवाय हे व्यवहार अशक्‍य आहेत. 

""स्वाईप मशीनची सुविधा राष्ट्रीयीकृत, खासगी आणि को-ऑपरेटिव्ह बॅंकांकडे उपलब्ध आहे. पाचशे-हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यावर हे मशीन बसवून घेण्यासाठी चौकशी सुरू झालेली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत हे मशीन व्यापाऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. सुरक्षित, कॅशलेस व अधिकृत व्यवहारांसाठी फायद्याचे आहे. सध्या ऐंशी हजार ते एक लाख स्वाईप मशीन आहेत. काही दिवसांत दुप्पट स्वाईप मशीन बसतील, अशी अपेक्षा आहे. 
- रवी धामणगावकर, उपमहासचिव, एसबीएच स्टाफ असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT