वसमतनगर तहसील कार्यालय 
मराठवाडा

वसमतच्या तहसील कार्यालयात आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष

सध्या पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमके या हंगामात अनेक प्रकारचे नैसर्गिक संकटे निर्माण होतात.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : येथील तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ता. एक जुन रोजी करण्यात आली असून नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी बुधवारी (ता. २३) केले आहे.

सध्या पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमके या हंगामात अनेक प्रकारचे नैसर्गिक संकटे निर्माण होतात. नागरिकांना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. यामध्ये ढगफुटीमुळे गावात पाणी घुसते, नदीला पुर येऊन रस्ता बंद होणे तसेच पुरामुळे नदीच्या दोन्ही भागातील गावाचा संपर्क तुटल्याने निर्माण होणारे जलसंकू, पूरात माणसे, जनावरे वाहुन जाणे, अती पावसाने शेतीपिकाचे नुकसान होणे, वीज पडून माणसे, जणावरे दगावने आदी प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे निर्माण होतात.

हेही वाचा- डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहून राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार

अशा आपत्तीच्या वेळी प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळण्याची अपेक्षा असते परंतू नेमकं मदत कुणाकडे मागायची यांची नागरीकांना माहिती नसते. तसेच तालुक्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात त्यामुळे या नद्यांना पुर येऊन संकटे निर्माण होऊ शकतात. अशा आपत्तीच्या काळात नागरीकांना प्रशासनाची तात्काळ मदत मिळावी यासाठी तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी तहसिल कार्यालयात एक जुन रोजी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क करण्यासाठी ०२४५४- २२००२८ या दूरध्वनी वर नागरीकांनी संपर्क साधून नैसर्गिक आपत्तीची माहिती द्यावी असे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT