marathwada sakal
मराठवाडा

जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क

गोदाकाठच्या गावांमध्ये दक्षतेची दवंडी

सकाळ वृत्तसेवा

जालना : पैठण येथील जायकवाडी धरणातून बुधवारी (ता.२९) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदाकाठ गावांना दक्षता बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह तहसीलदारांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीकाठच्या गावात बुधवारी (ता.२९) दवंडी देण्यात आल्या आहेत.

जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे आदी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हालविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पूर विसर्गाबाबत इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामस्थांनी जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह अंबड व घनसावंगी तहसीलदारांना देण्यात आले, तसेच सतर्क राहण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तसेच गावागावांत दवंडी देण्यात आली असून कोणीही गोदावरी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

दरम्यान पुर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाच इन्फ्लेटेबल रबर बोट, एक इन्फ्लेटेबल प्लॅस्टिक बोट, शंभर लाइफ जॅकेट, शंभर लाइफ रिंगसह इतर साहित्य उपलब्ध आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून गोदाकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्याबाबत संबंधित तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे. तसेच जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून पूर्वी तयार करण्यात आली आहे.

- दीपक काजळकर,

अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिममध्ये शिवसेनेत बंडखोरी; जाणावळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT