jalna
jalna 
मराठवाडा

उमेदवारी मागे घेईपर्यंत युतीची चर्चा : दानवे

सकाळवृत्तसेवा

जालना : समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेशी युतीबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा निवडणूकितील उमेदवारी मागे घेईपर्यंत चालणार आहे. आम्ही युती साठी हात पुढे केला असुन हातात घ्यायचा की नाही हा निर्णय शिवसेनेचा असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक जालना येथील मंठा चौफुली येथील कलश सीड्स मैदानावरील ही झाली. प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीसआमदार, खासदारसह राज्यभरातून अकराशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. गेल्या बैठकीत झालेल्या ठरावाविषयी या कार्यक्रमाविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठवाड्याच्या विकासावर राज्य व केंद्रने काय भूमिका  घेतली त्याची मांडणी बैठकीत करण्यात आली. बैठकीत यात राजकीय प्रस्ताव महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडला. महाराष्ट्राच्या विकासावर केंद्र शासनाचे सहकार्य काय या विषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रस्ताव मांडला. राज्यातील श्रीगोंदा, रायगड, सातारा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील  नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले.

पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार
देशात आणि राज्यात किती वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या झाल्या तरी भाजप संघटन संघटना च्या बळावर लोकसभेत पुन्हा निवडून येईल आणि पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची वर्णी लागेल. राज्यात 48 पैकी शेचाळीस मतदारसंघाचा दौरा केला आहे आणि या दौऱ्यातही भाजपचा संघटन मजबूत असल्याचा दावा यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

शिवसेनेने जोडी मारली तरी ती आमच्या सोबत राज्य व केंद्रात सत्तेत सहभागी आहे.सरकार कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यांनी कुठल्याही कामाला विरोध केला नाही.यामुळे युतीची आम्हला अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवक्ते माधव भांडरी, केशव उपाध्ये, शिरीष बोराळकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT