file photo
file photo 
मराठवाडा

दोन सभापतीसह एका सदस्याविरुद्धची याचिका निकाली; हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात निवाडा 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा परिषदेतील बहुचर्चित सभापती निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय उर्फ भैय्या देशमुख यांच्यासह चंद्रभागा  जाधव व बाजीराव जुमडे या तिघांविरोधात अनर्हता अधिनियमांतर्गत कारवाई करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण निकाली काढत तिघांना अभय दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सभापती व विशेष समिती यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन निवडी संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण, समाज कल्याण व इतर दोन समिती सभापती पदाच्या निवडी करिता ता. १४ जानेवारी २०२० रोजी निवड प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी ता. १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून दिलीप देशमुख यांनी पक्ष सदस्यांची बैठक घेऊन पक्षाचे निर्देश म्हणजेच व्हिप जारी केला होता. त्यानुसार निवडणुकीत सभापती पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये पक्षाकडून सतीश पाचपुते यांना समाज कल्याण व कैलास साळुंखे यांना विशेष समिती सभापतीपद पदाचे उमेदवार ठरविण्यात आले होते. परंतु पक्षातील गैरअर्जदार असलेल्या तीन सदस्यांनी सदर पक्ष निर्देश विरुद्ध मतदान केले. ज्यामुळे पक्ष उमेदवारांचा पराभव झाला. असे म्हणणे मांडत सदरील सदस्यांच्या बाबतीत महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ (१) ब नुसार याचिका दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. 

सदर याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अकरा वेळा सुनावणी ठेवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी निकाल राखून ठेवला असता ता. १४ सप्टेंबर २०२० रोजी अर्जदार दिलीप देशमुख यांनी सदर प्रकरण परत चालविण्याची विनंती करीत म्हणणे मांडण्याची संधी मागितली. त्यानंतर या प्रकरणावर पुन्हा आठ वेळा सुनावणी ठेवण्यात आली. त्या दरम्यान अर्जदारांना कोणताही साक्ष किंवा ठोस पुरावा न्यायालयाच्या समोर ठेवता आला नाही. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अर्जदार दिलीप देशमुख यांचा विवाद अर्ज नामंजूर केला. यामुळे गैरअर्जदार संजय देशमुख, चंद्रभागा जाधव व बाजीराव जुमडे यांच्या अनर्हताबद्दल दाखल केलेली याचिका देखील निकाली निघाली आहे. गैरअर्जदार यांच्या वतीने ॲड. मिलिंद गाजरे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT