file photo 
मराठवाडा

हिंगोलीतील क्लेशदायक घटना : सेनगावात अस्थीची विटंबना, काय आहे प्रकरण वाचा

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव शहरातील तेली समाजातील एका व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी अंत्यविधीला विरोध म्हणून जानीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी रविवारी (ता. १२) एकाविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अस्थी जमा करण्यापूर्वीच स्मशानभूमीत पाणी सोडल्याने अस्थी वाहून गेल्या. या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

स्मशान भूमिसाठी अनेकांनी जमीनी देत लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अजूनही अनेकावर उघड्यावर अंत्यविधी पार पाडण्याची वेळ येत आहे. सेनगाव शहराजवळच तेली समाजासाठी स्मशानभूमी आहे. याच ठिकाणी त्यांना अंत्यविधी करावा लागतो. परंतु काही समाज विघातक लोकांचा या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी विरोध असून बाजूलाच त्यांच्या शेत जमीनी आहेत. यामुळे तेली समाजाविरुद्ध द्वेष भावना बाळगल्या जात आहेत. 

अनेकदा यांच्यात वाद सुध्दा झाले

नियोजित ठिकाणी तेली समाज अनेक वर्षांपासून अंत्यविधी करतात. परंतु येथे अंत्यविधी करण्यासाठी बाजूला असलेल्या शेत शिवारातील काही व्यक्तीचा विरोध होता. तोच विरोध आता तेली समाजातील अंत्यविधीची विटंबना करण्यापर्यंय पोहोचला. या कारणाने अनेकदा यांच्यात वाद सुध्दा झाले आहेत.

अर्धवट जळालेला मृतदेह व अस्थी वाहून गेल्या

दरम्यान शहरातील पांडुरंगआप्पा नामदेवआप्पा राऊत यांचा अंत्यविधी शनिवारी (ता. १२)  सप्टेंबर रोजी पार पडला होता. अंत्यविधी पार पाडून मृताचे नातेवाईक घराकडे परतले. रविवारी (ता. १३) अस्थी सावडण्याचा कार्यक्रम होता. तेंव्हा मृत व्यक्तीचे नातेवाईक सावडण्याच्या कार्यक्रमाला अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचले. अन त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण अस्थी पाण्यात तरंगताना व वाहून जाताना दिसली. एवढेच नाही तर पार्थीव अर्धवट जळालेले दिसून आले. हा सर्व प्रकार जेंव्हा नातेवाईकांच्या लक्षात आला तेंव्हा त्यांना समजले की हे कृत्य कुणीतरी जाणीवपूर्वक केले. 

सेनगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा 

त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी सेनगाव पोलिस ठाणे गाठुन एक निवेदन सादर केले. जोपर्यंत स्मशानभूमीत जाणीवपूर्वकपणे पाणी सोडणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ठाण्यातुन जाणार नाही असे पोलिस प्रशासनाला सांगितले. यावेळी नातेवाईकांनी सेनगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. पोलिस प्रशासनाकडून तुकाराम परसराम फटांगळे याच्या विरोधात मृतदेहाची विटंबना करून भावना दुखावल्या बाबत   सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT