jalna sakal
मराठवाडा

Jalna : जालना जिल्ह्यात दोन दिवसांत २९६ मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप ; आतापर्यंत सापडल्या तीन हजार ३१८ नोंदी

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातून मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनही कुणबी प्रमाणपत्र वाटपात गतिमान झाले आहे. मागील दोन दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून तब्बल २९६ कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जालना : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातून मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनही कुणबी प्रमाणपत्र वाटपात गतिमान झाले आहे. मागील दोन दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून तब्बल २९६ कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण केले. त्यामुळे राज्य शासनाकडून मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीचा शोध घेण्यास सुरवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ३१८ कुणबी नोंदी आढळून आल्या असून नोंदी शोधण्यासह कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवार (ता.१९) ते रविवार (ता.२१) सार्वजनिक सुटी असतानाही शासकीय कार्यालयांचे काम सुरू ठेवले आहे. दरम्यान मागील दोन दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाकडे ३९१ जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.

त्यापैकी २९६ जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे. आतापर्यंत तीन हजार ३१८ नोंदी सापडल्या असून दोन हजार ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे जिल्हा प्रशासनाकडून वाटप करण्यात आले आहे. शिवाय शुक्रवार (ता.१९) ते रविवारी (ता.२१) दरम्यानही कुणबी प्रमाणपत्र वाटपासह नोंदींचा शोध घेतला जाणार आहे.

तर शोध मोहिमेदरम्यान पुन्हा परतूर, भोकरदन, मंठा तालुक्यातील काही गावांमध्ये कुणबी नोंदी मिळून आल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. जवळपास या पाचशे कुणबी नोंदी असून या नोंदीचे दस्त शिंदे समितीला सादर केल्यानंतर या कुणबी नोंदीची माहिती जिल्हा प्रशासन जाहीर करणार आहे.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आणि शिंदे समितीच्या सूचनेनुसार कुणबी नोंदीचा शोध सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार ३१८ नोंदी मिळून आल्या असून आतापर्यंत दोन हजार ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांमध्ये २९६ कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहेत.

—डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT