file photo 
मराठवाडा

हिंगोलीकराच्या सुरक्षेसाठीच जिल्ह्यात दुसऱ्यादा लाँकडाऊन, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या कमी करुन हिंगोलीकरांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात दुसऱ्यादा लाँकडाऊन लावण्यात आले असून काही दिवस जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधीकारी रुचेश जयवंत यांनी बुधवार (ता. ३१) सोशल मीडीयावर केले आहे. 

श्री. जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात कोरोनाचे २२४ रुग्ण झाले आहेत. हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.  कोरोना रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात सोमवार पासून सात दिवस संचारबंदी लागु केली आहे. यामुळे शहरातील गर्दी कमी होऊन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच संचारबंदीचा चार एप्रिल पर्यंत दिलेला कालावधी पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. 

आतापर्यंत जिल्ह्यात प्रशासनास नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे देखील ते सर्वाकडुन अपेक्षित आहे. हिंगोलीच्या सुरक्षेसाठी संचारबंदी लावली आहे. कालावधी स़ंपताच ती शिथिल केली जाईल.  हिंगोलीला सुरक्षित ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करणे देखील गरजेचे आहे. यामुळे सर्वांना सहकार्य करत, सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्स पाळत प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करत प्रशासनास सहकार्य करावे संचारबंदीच्या कालावधीत कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे यामुळे कोरोनाची साखळी कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT