download 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्याला ८७ हजार १७१ क्विंटल बियाणे लागणार

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० मध्ये कापसाच्या प्रस्तावित पेऱ्यात कापसाचे दोन लाख दहा हजार, तर सोयाबानीचे दोन लाख ३८ क्षेत्र यंदासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत कापसाच्या पेऱ्यात यंदा १५ हजार हेक्टरने वाढ दाखविण्यात आली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात १२ हजार हेक्टरने घट दाखवली आहे. एकूण पाच लाख ३८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

गतवर्षी खरिपात १०० टक्के पेरण्या झाल्या होत्या. परंतु, ऐन दिवाळीत, अर्थात सोयाबीनच्या काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पावसात सोयाबीन भिजल्याने अनेक शेतकऱ्यांना यंदा पेरणीसाठी चांगले बियाणेदेखील ठेवता आले नाही. उलट कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या कल सोयाबीनसोबत कापसाकडे वळला आहे. २०२० च्या खरीप हंगामात शेतकरी कापसालाही पसंती देणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित आराखड्यावरून दिसते. 

खरिपात पाच लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित
गतवर्षी कापूस एक लाख ९५ हजार हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आला होता. यंदा त्यात वाढ दाखविली आहे. यंदा खरिपात पाच लाख ३८ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी चार हजार ५०० हेक्टर, बाजरी ५०० हेक्टर, मका १२०० हेक्टर, तूर ५१ हजार हेक्टर, मूग २५ हजार हेक्टर, उडीद आठ हजार हेक्टर, तीळ २०० हेक्टर, सोयाबीन दोन लाख ३८ हजार हेक्टर, कापूस दोन लाख १० हजार हेक्टर, अन्य पिकांची ३०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.

महाबीज व खासगी कंपन्यांकडे बियाणांची मागणी 
महाबीज व खासगी कंपन्यांकडे ८७ हजार १७१ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. ज्वारीच्या २९० क्विंटल, बाजरीच्या सात क्विंटल, मकाच्या १८० क्विंटल, तुरीच्या तीन हजार ९७८ क्विंटल, मुगाच्या १९५० क्विंटल, उडदाच्या ५४० क्विंटल, तिळाच्या चार क्विंटल, सोयाबीनच्या ७४ हजार ९७० क्विंटल, कपाशीच्या पाच हजार २५० क्विंटल बियाणाचा समावेश आहे.

दीड लाख मेट्रिक टन खताची मागणी
खरिप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख ५१ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यातील ९१ हजार १७० मेट्रिक टन खत मंजूर झाला आहे, तर ता.१३ एप्रिलपर्यंत ११ हजार ८९२ मेट्रिक टन खत मिळाला आहे. त्यापूर्वीचा जिल्ह्यात २४ हजार ७११ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. एकूण उपलब्ध ३६ हजार ६६३ मेट्रिक टन खतापैकी तीन हजार ८४७ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून ३२ हजार ८१६ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT