NND23KJP02.jpg
NND23KJP02.jpg 
मराठवाडा

विभागीय आयुक्तांनी घेतला अधिकाऱ्यांचा वर्ग

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता. २३) बैठकीत विभागनिहाय मॅरेथॉन आढावा घेतला. यात त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकरणे, अपूर्ण कामे तसेच प्रगतीपथावरील विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी हिंगोलीच्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड, हिंगोलीचे अधिकारी उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य नांदेड दौऱ्यानिमित्त शुक्रवारी (ता. २३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नियोजन भवनमध्ये सकाळी अकरापासून बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्यासह नांदेड, हिंगोली व परभणी येथील विविध विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करा
सुनील केंद्रेकर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी अभ्यासपूर्ण विषयाची टिपण्णी तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केली, तर विकासाकामांना चालना मिळेल, असे सांगितले. जिल्ह्यातील कृषी, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, तीर्थक्षेत्र विकास या विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच विविध विभागाची अपूर्ण कामे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घ्यावी. कृषी प्रक्रिया उद्योगांना चालणा देण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी परिणामकारक योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांची मांडणी करून पीएम किसान, शेतकरी कर्जमुक्ती, अतिवृष्टी नुकसान व मदत वाटप, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटुंबांची मदत, आरोग्य सुविधा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, जिल्हा परिषदेचे रस्ते आदींची माहिती दिली.

हेही वाचलेच पाहिजे....चारशे दहा ग्रॅमचे शिवभोजन

हिंगोलीच्या प्रशासनावर नाराजी
विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हिंगोली जिल्ह्याचाही समावेश होता. या वेळी हिंगोली प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमुळे त्यांचे समाधान झाले नसल्याने केंद्रेकरांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी त्यांनी काहींना धारेवर धरल्याचेही कळाले.

शासनस्तरावर पाठपुरावा करू
आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी बैठकीचा ताण न घेता, लहान-सहान योजनांऐवजी एखाद्या मोठ्या प्रकल्पाविषयी अभ्यासपूर्ण माहिती तयार करावी. अशा परिणामकारक योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपण स्वत: शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यासाठी अधिकाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

SCROLL FOR NEXT