ज्ञानराज चौगुले  Sakal
मराठवाडा

उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

नवीन वर्षातील दोन आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्गाची संख्या वाढली आहे.

अविनाश काळे

उमरगा : नवीन वर्षातील दोन आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्गाची संख्या वाढली आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अमलबजावणीचा प्रयत्न सुरू असताना मकर संक्रांतीचा सण असो की बाजारपेठेत बेफिकीरीने फिरणारे व्यक्ती असोत त्यामुळे संसर्ग पसरत असुन रुग्णसंख्या वाढत आहे. (Marathwada Corona Patient Updates)

मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाने तालुक्यात बाधितांची संख्या वाढली होती अनेकांवर मुत्यूचा दुर्दैवी प्रसंग ओढावला तर अनेकांनी वेदनांचा भार सहन करत मुत्युपासुन सुटका करून घेतली होती. आता पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील संसर्गाची गती वाढत आहे. एक ते चौदा जानेवारीपर्यंत १३१ बाधितांचा आकडा झाला आहे.

त्यात १३ आणि १४ या दोन दिवसात ५९ बाधिताची संख्या आहे. १३ तारखेच्या रॅपिड चाचणीत अकरा तर आरटीपीसीआरच्या चाचणीत २४ असे ३५ बाधित रुग्ण आढळले. तर १४ तारखेला रॅपिड चाचणीत २४ रूग्ण आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरच्या चाचणीचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

उमरगा -लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यांच्या आरटीपीसीसारच्या चाचणीचा अहवाल शनिवारी (ता. १५) प्राप्त झाला आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे ; तरीही खबरदारी म्हणुन पूणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT