file photo 
मराठवाडा

मारु नका, सर्व देतो, चोरट्यांना विनंती 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : घराकडे परतत असलेल्या एका युवकास अनोळखी तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या जवळचे नगदी चार हजार व दुचाकी असा ४० हजाराचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. ही घटना इंगेवाड पेट्रोलपंप ते नाईक कॉलेज दरम्यान शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. 


पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन गौत्तम कोंडिबा चिंतोरे (वय३२) रा. शाहुनगर, वाघाळा, नांदेड हा नविन कौठा येथील पीव्हीआर मॉलमध्ये नोकरी करतो. वाहन तळावर त्याने दिवसभर आपले कर्तव्य बजावून शुक्रवारी (ता. १५) रात्री एकटाच नेहमीप्रमाणे तो आपल्या दुचाकी (एमएच२६-बीबी-१११८) वरून शाहूनगरकडे रात्री साडेअकराच्या सुमारास जात होता. रात्रीची वेळ व आजूबाजूला कुणीच नसल्याचे पाहून रस्त्यात दबा धरुन बसलेले अनोळखी तीन चोरट्यांनी गौत्तम चिंतोरे याची दुचाकी अडविली. 

मारु नका देतो... 


त्याला एका चोरट्याने दाबून धरुन दोघांनी लाकडाने मारहाण केली. यात ते जखमी झाले. मार सहन होत नसल्याने त्याने आपल्या जवळील सर्व काही काढून घ्या पण मारु नका अशी विनंती केली. त्यानंतर चोरट्यांनी त्याच्या बॅगमधील नगदी चार हजार २१० रुपये, पाकिटमधील कार्ड व पाचशे रुपये आणि दुचाकी असा ३९ हजार ७१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. जखमी अवस्थेत तो आपल्या घरी गेला. त्यानंतर त्याला नातेवाईकानी नांदेड ग्रामिण पोलिसांना सांगुन विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याने उपचार घेऊन रविवारी (ता. १७) नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार आर. एम. घोळवे करित आहेत.  


पोलिस  आवाहन 


नागरिकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो वर्दळीच्या रस्त्याने आपल्या दुचाकीवरुन जावे. तसेच एकटे जाण्याचे टाळावे. रात्रीच्या वेळी प्रवासात आपल्या सोबत एक दुसरा मित्र असायला पाहिजे. आपल्या जवळ जवळच्या पोलिस ठाण्याचा किंवा पोलिस निरीक्षकांचा मोबाईल क्रमांक असायला पाहिजे. आपणास काही संशय आल्यास तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती द्यावी. जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत. लुटमारीच्या घटनावर पोलिस लक्ष ठेवून असून अने क चोरटे अटक करण्यात आले आहेत. यापुढेही या चोरट्यांना अटक करणार आहे.

पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे (नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT