संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

स्वतःच परदेशातून आला, लोकांवर उपचार करू लागला : डॉक्टरला नोटीस

सकाळ वृत्तसेवा

जालना - परदेशातून शहरात आलेल्या एका  नामांकित डॉक्टराने प्रशासनाला माहिती दिली नाही.  तसेच स्‍वत:ला होम क्वारंटाईन न करता  रूग्णालयात   रूग्णांवर उपचार सुरू केल्याची धक्कादायक बाब गुरूवारी (ता.19) समोर आली आहे. 

नागरिकांनी या डॉक्टरची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे  या डॉक्टरला  जिल्हाधिकाऱ्यांसमोर खुलासा सादर करण्यासह हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेऊन अलगीकरण करून राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यभरात कोरोना विषाणूच्या संख्येत वाढत होत असताना   शहरातील एक अस्थी रोग तज्ज्ञ डॉक्टराने परदेशातून येऊन एका खासगी हॉस्‍पीटलमधील रूग्णावर उपचार केले.  जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना  परदेशातून  येऊनही प्रशासनाला कुठलीच माहिती दिली. तसेच  स्वतःहून होम क्वारंटाईन न होता रुग्णावर उपचार करत असल्याने  नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  तक्रार केली. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी  या डॉक्टरला नोटीस बजावत  जिल्हाधिकाऱ्यांसमोर लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले. तसेच   स्वतः हुन  जिल्हा सामान्य रुग्णालयात हजर होऊन होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारून घ्यावा. व अलगीकरण करून राहण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी दिरंगाई केल्यास आपत्ती व्यवस्थान कायद्यानुसार सदर डाॅक्टरवर कारवाई करण्याचा इशारा  आरोग्य विभागाने  बजावललेल्या नोटीसमध्ये देण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT