File photo 
मराठवाडा

कुत्र्यांच्या संसर्गाचा धोका बळावतोय : कसा ते वाचलेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह मोठ्या व्यक्तिंनाही अनेक साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे आता गावातील पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांवर सुद्धा याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

शहरातील कुठल्याही परिसरात जा, कुत्र्यांचे घोळकेच्या घोळके दृष्टीस पडतात. या कुत्र्यांची दहशत पसरली असल्याने महिला व शाळकरी मुलांमध्ये धास्ती बसली आहे. मुकाट कुत्र्यांमध्ये बहुतांश कुत्र्यांना खरूज होणे, अंगावरील पुर्ण केस गळणे, अंग लाल पडणे अशा अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. याकडे महापालिकेसह पशविभागाने लक्ष देवून विविध आजारांनी ग्रासलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.  

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
काही दिवसांपूर्वी शिवनगर भागात कुत्र्यांना अशाच प्रकारच्या संसर्गामुळे मारून फेकून देण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यानंतर प्राणी मित्रांनी त्यावर आक्षेप घेत आरोग्य विभागाला जाब विचारला होता. त्यानंतर त्याचे काय झाले? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आता या हजारो संसर्ग झालेल्या कुत्र्यांचे काय होणार? असा प्रश्न प्राणी मित्रांनी उपस्थित केला आहे. पशू विभागानेही याकडे तात्काळ लक्ष केंद्रीत करून अशा कुत्र्यांवर वेळीच उपचार सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  

ज्येष्ठ नागरिकही त्रस्त
गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचे तांडेच्या तांडे रहात असल्याने महिला, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून फिरायला जातात. तर मुलांची याचदरम्यान शाळेच जाण्याची व येण्याची घाई असते. अशा वेळी समुहाने वावरत असलेले कुत्रे अनेकदा पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. कित्येकदा चावाही घेतलेला आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.  

वेळीच उपचार करावेत
संसर्ग झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार न केल्यास अनेक कुत्र्यांवर आणि मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भिती व्यक्त होतआहे. त्यामुळे वेळीच उपचार सुरु करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी प्राणीमित्रांसह परिसरातील खेड्यांमधील नागरिकांकडून होत आहे.

सध्या नांदेड शहरामध्ये खरूज झालेल्या कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून, याचा परिणाम पाळीव आणि मोकाट जनावरांसह मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे काळाची गरज आहे. 
- लिंगेश्‍वरअप्पा स्वामी (भावसार चौक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT