file photo 
मराठवाडा

Breaking : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दुहेरी चिंता, सकाळी पुन्हा जमिनीतून आवाज

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना विषाणूच्या दहशतीसोबतच जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जमिनीतून येणाऱ्या गुढ आवाजाचीही दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता.दोन जून) सकाळी सात वाजता जिल्ह्यातील अनेक गावांत जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज झाल्याने नागरिक रस्त्यावर आले होते.

मंगळवारी सकाळी सात वाजता जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज आले. भूकंपाच्या भीतीमुळे नागरिक रस्त्यावर आले.  सतत होत असलेल्या या आवाजाने नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसोबतच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे सकाळी सात वाजता जमिनीतून गूढ आवाज आला.  हे आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात आले. 

तसेच कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, कवडा, निमटोक, पेठवडगाव, बोल्डा, येहळेगाव गवळी, असोला, हारवाडी, सापळी आदी गावांतही जमिनीतून येणाऱ्या गुढ आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले असून गुढ आवाजाची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.
    
दरम्यान पांगरा शिंदे, पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपासून जमिनीतून गुढ आवाज सातत्याने येत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही वर्षांपासून गुढ आवाजाची मालिका सुरू आहे. मात्र त्याचे गुढ अद्यापही उकलले नाही. या गावात आवाज आल्यावर वसमत तालुक्यासह औंढा व कळमनुरी गावातील अनेक गावात हा आवाज येत आहे. या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला वारंवार कळविले आहे. 

दोन वर्षांपूर्वी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पथकाने भेट देऊन पाहणी केली होती.  मात्र,  आवाजाच्या गुढ बद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावकऱ्यांतून होत आहे. दरम्यान सलग तीन आवाजाने गावकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT