सेंट्रीक जाॅ रिलेशन उपकरण 
मराठवाडा

औरंगाबादच्या डॉ. पळसकर यांनी बनवले सेंट्रिक जॉ रिलेशन उपकरण 

याेगेश पायघन

औरंगाबाद - कृत्रिम, वेड्यावाकड्या दातांची सांगड योग्यरीतीने घालण्यासाठी, जबड्याखालील वेदनेवर मात करण्याकरिता डॉ. जयंत पळसकर यांनी सेंट्रिक जॉ रिलेशनमधील उपकरण तयार केले आहे. त्याला दंतशास्त्रातील अमेरिकन, युरोपियन पेटंट मिळाले आहे. दंतशास्त्रात असे पेटंट मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. भारत सरकारने तातडीने दखल घेत या उपकरणाच्या निर्मितीसाठी 50 लाखांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. 

दंतशास्त्रातील सेंट्रिक जॉ रिलेशन हा विषय गेल्या 100 पेक्षा अधिक वर्षांहून वादाचा ठरला आहे; परंतु या उपकरणाच्या शोधामुळे त्या वादावर कायमचा पडदा पडणार आहे. दंतशास्त्रात अमेरिकन, युरोपिअन पेटंट मिळणारे भारताचे पहिले उपकरण असल्याचा दावा डॉ. पळसकर यांनी केला आहे. ते पुणे येथील सिंहगड दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंतशास्त्र विभागप्रमुख असून, मूळचे औरंगाबादकर आहेत. 

नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दंत शाखेचे डॉ. पळसकर सध्या अधिष्ठाता आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विविध नियतकालिकांच्या संपादक मंडळावर कार्यरत असून, काही नियतकालिकांचे मुख्य संपादक म्हणूनही काम पाहत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

कलर्स मराठीची नवी कल्पना कामी आली! 'बाईपण जिंदाबाद'चं प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक; म्हणतात- आश्चर्य वाटलं की...

Latest Marathi News Live Update : सासवडसह परिसरात जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT