फोटो 
मराठवाडा

(शिवजयंती) - ड्रीम मॅराथॉन स्पर्धेस राज्यस्तरीय स्वरुप देणार- खा. चिखलीकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रन फॉर छत्रपती ड्रीम मॅराथॉन स्पर्धेचा प्रतिसाद पाहता पुढील वर्षापासून या स्पर्धेला राज्यस्तरीय स्वरुप देण्यात येणार असून, बक्षिसांच्या रक्कमेतही वाढ करण्यात येणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केले.

भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले आयोजित ड्रिम मॅराथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर बोलत होते. यावेळी प्रवीण साले, संजय कौडगे, अरुंधतीताई पुरंदरे, अशोक पाटील धनेगावकर, कुणाल गजभारे आदींची उपस्थिती होती. ड्रिम मॅराथॉन स्पर्धेत अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी या स्पर्धेत भारतीय जनता पक्ष संयोजनामध्ये प्रमुख भूमिका निभावणार असून, स्पर्धकांच्या राहण्याची व्यवस्था तसेच बक्षिसांची रक्कम देखील वाढविण्यात येणार असल्याचे खासदार चिखलीकर यांनी जाहीर केले. 

शहराच्या मुख्य रस्त्यावरून मॅरेथॉन

शिवजयंतीनिमित्त भाग्यनगर येथे बुधवारी (ता. १९) सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन खासदार चिखलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या स्पर्धेत नांदेडसह परभणी, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर येथील स्पर्धक सहभाग झाले होते. भाग्यनगर, वर्कशॉप, शिवाजीनगर, कलामंदीर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चिखलीवाडी कॉर्नर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, वसंतराव नाईक चौक, आनंदनगरमार्गे भाग्यनगर येथे या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. 

विजयी स्पर्धाकांचा सत्कार

पुरुष गटातून परभणी येथील संजय मारोती झाकणे प्रथम, परभणी येथील सचिन पवार व्दितीय, तर परभणी येथील गोपाळ कदम याने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे राजमार्ग अकॅडमीचे संचालक डॉ. धनंजय देवमाने, अविनाश राठोड, हरभजनसिंग पुजारी यांच्या सौजन्याने बक्षीस वितरण करण्यात आले. तर महिला गटातून परभणी येथील अश्विनी जाधव प्रथम, संस्कृती वर्‍हाड व्दितीय तर अश्विनी कुरुकझाडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना अनुक्रमे भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रवीण बंडेवार, संतोष बेरुळकर यांच्या सौजन्याने बक्षीस वितरीत करण्यात आले. 

यांनी परिश्रम घेतले.

तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व टी शर्ट वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास व्यंकट मोकले, व्यंकटेश जिंदम, गोपीले सर, व्यंकटेश साठे, दिपक पावडे, धीरज स्वामी, चंचलसिंह जट, बालाजी शेळगावकर, कैलास वाघ, सतीश बेरुळकर, आशिष नेरलकर, संदीप कर्‍हाळे, नवल पोकर्णा, बजरंग ठाकुर, हरभजनसिंग पुजारी, नितीन बंडेवार, सोनू उपाध्याय, राजेंद्रसिंह शाहू, शंकर वानेगावकर, श्रीराज चक्रावार, रुपेश व्यास, सुरेश निलावार, संतोष परळीकर, सूर्यकांत कदम, गणेश मोरे, बाळू लोंढे, विशाल शुक्ला, राज यादव, अभिजित देशमुख, आनंद पावडे, बागड्या यादव, संदीप पावडे, मनोज जाधव, मारोती वाघ, सुनील भालेराव, जनार्दन वाकोडीकर, सोनू कल्याणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू कपाटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक कुणाल गजभारे, डॉ.धनंजय देवमाने, अविनाश राठोड, राघोजीवार, पांचाळ, कुलकर्णी, शेख सलीम, तोडेवाड, महाजन, संदीप शिरसे, शिवा डांगे यांनी परिश्रम घेतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT