Drone
Drone 
मराठवाडा

शेतीसाठीचे ड्रोन तंत्रज्ञान लोदग्यात विकसित होणार

सकाळवृत्तसेवा

लातूर - कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि लोदगा (ता. लातूर) येथील सर छोटूराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात करार करण्यात आला आहे. यामुळे आता लोदगा येथे ड्रोन तंत्रज्ञान विकसित होणार आहे. या संदर्भात प्रशिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे पथक लवकरच बंगळुरू येथे येणार असल्याची माहिती भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. के. पी. जे. रेड्डी यांनी दिली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी शेतीसाठी उपयुक्त ड्रोन विकसित केले आहेत. त्याचे प्रात्यक्षिक लोदगा येथे सोमवारी दाखविण्यात आले. यावेळी इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. के. पी. जे. रेड्डी, प्रा. डॉ. जी. गोपालन व प्रा. एस. एन. ओमकार यांच्यासह राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. त्यानंतर आज या संदर्भात करार करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून कीड, खत, जलव्यवस्थापन सोपे होणार आहे. याशिवाय विविध कामांसाठी ड्रोनचा वापर करता येणार आहे. या संदर्भातील तंत्रज्ञान लोदगा येथे विकसित होणार आहे. कराराप्रसंगी डॉ. रेड्डी,  प्रा. डॉ. जी. गोपालन, पाशा पटेल, नागार्जुना फर्टिलायझरचे दुष्यंतकुमार त्यागी उपस्थित होते.

नागार्जुना फर्टिलायझर्सचे त्यागी यांनी लोदगा येथे व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली. अशापद्धतीचा करार करणारे सर छोटुराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय हे देशातील पहिलेच महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा एक गट बंगळुरू येथे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे श्री. पटेल म्हणाले. यावेळी जियो लाईफचे विनोद लाहोटी, फिनिक्‍स फाउंडेशनचे समन्वयक परवेज पटेल, विक्रम पाटील, प्राचार्य थोरात उपस्थित होते.

कृषी क्षेत्रातील गरज ओळखून त्यानुसार ड्रोनचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लोदगा येथील केंद्र भविष्यात आंतरराष्ट्रीय केंद्र बनेल.
- प्रा. डॉ. के. पी. जे. रेड्डी, शास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT