नेकनूर (ता. बीड) - जनावरांनी फुललेला रविवारचा आठवडे बाजार. 
मराठवाडा

आवंदाचं वेत नशिबात नाही

अमोल तांदळे

‘पहिल्या वेताला १४ लिटर दूध दिलं. आता महिन्यावर आलीय, पण आवंदाचं वेत खायचं नशिबात नाही. हातावर कवड्या आल्या तरी इकल्याशिवाय मार्ग नाही. हत्तीच्या बाजूला उभी केली तर कुणीबी त्याची बहीण म्हणीन; पण आता तिला काय कुसळ खाऊ घालायची का?’ अशी वेदनावजा तळमळ व्यक्त केलीय रामदास झेंडे यांनी. 

फक्राबाद (जि. उस्मानाबाद) येथील श्री. झेंडे रविवारी (ता. २१) नेकनूर येथील आठवडे बाजारात म्हैस विक्रीसाठी घेऊन आले होते. नेकनूरचा जनावरांचा आठवडे बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. बैलांसह म्हशी, गाई, शेळ्यांचा येथे बाजार भरतो. सध्या बाजारात विदारक चित्र आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरीच बाजारात अधिक आढळून आले. 

यातील फक्राबाद येथील झेंडे यांच्याशी बोलल्यानंतर दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची वेदना समोर आली. फक्राबाद म्हणजे मांजरा नदीकाठावरील काळभोर जमीन असलेले गाव. २० ते ३० फुटांपर्यंत खडक नाही. 

‘पाऊस असल्यास सोनं पिकावं अशी जमीन. पण यंदा नदी वाहणं तर दूरच डबकंबी भरलं नाही,’ असे झेंडे सांगत होते. त्यांनी आपली म्हैस बाजारात विक्रीसाठी आणली होती. पहिल्या वेताला १४ लिटरपर्यंत दूध दिले. आता गाभन असलेल्या म्हशीचे महिन्याभरात वेत होऊन १८ लिटरपर्यंत दूध देईल. साधारण ७० ते ७५ हजार रुपयांची किंमत असलेली म्हैस ते ५० हजार रुपयांपर्यंत विकायला तयार होते. पण, सकाळी दहाला बाजारात आलेल्या रामदास झेंडेंच्या म्हशीला चार वाजेपर्यंतही कोणी गिऱ्हाईक नव्हते. हीच गत हिंगणीच्या (ता. बीड) किरण तांदळे यांचीही होती. लाखाच्या पुढची बैलजोडी ते पाऊण लाखाला द्यायला तयार होते.

बाजाराची स्थिती आणि कारण
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने रब्बीची पेरणीच झाली नाही. इथून पुढे आठ महिने जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आतापर्यंत साठून ठेवलेला चारा संपत आला आहे. मिठाला पैसा नाही तर इकत चारा कुठून घ्यायचा? सोयाबीन, उडदाचं भुस्कट तरी किती दिवस पुरंन, असे शेळ्या विकायला आलेले रमेश चौरे सांगत होते. मागच्या दोन महिन्यांपासून या बाजारात जनावरांची वर्दळ वाढून किंमती मात्र पडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT