vihir 
मराठवाडा

दारू पिताना विहिरीत पडला, नागरिकांनी बाहेर काढला आणि पुन्हा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्यातील पहेणी येथील मद्यपी राजाराम शेवाळे हा बुधवारी (ता.चार) मध्यरात्रीनंतर रामगल्ली येथील एका जुन्या विहिरीत पडला, त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अरविंद नावाच्या व्यक्तीने गल्लीतील लोकांना जागे केले. अरविंद याने तत्काळ पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी गल्लीतील नागरिकांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढले व रूग्णालयात दाखल केले. गुरुवारी पहाटे रुग्णालयातून तो मद्यपी फरार झाला. 

राम गल्लीत एक जुनी पन्नास ते साठ फुट विहीर आहे. पूर्वी लोक यामधून पाणी भरत होते, मात्र आता ती गाळाने भरलेली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास पहेणी येथील राजाराम तातेराव शेवाळे हा मद्यपी दारूच्या नशेत असल्यामुळे पडला आणि मला वाचवा म्हणून जोरात ओरडत होता. दरम्यान, गल्लीतून अरविंद दामोदर वाढे यांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी गल्लीतल्या लोकांना जागे केले. विहिरीत एक अनोळखी व्यक्ती पडल्याचे सांगितले आणि सरळ शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक श्री. सय्यद यांना माहिती दिली.

पोलिस राम गल्लीत घटनास्थळी
रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी एन. जी. करेकर, रामराव चिडे, दिलीप बांगर, श्री.भांगे, श्री.  मोरे, श्री. डाखोरे यांना माहिती मिळताच ते सर्वजन तत्काळ राम गल्लीत घटनास्थळी आले. त्यांनी गल्लीतील प्रकाश बांगर, प्रदीप नाईक, गणेश बांगर, अजय कान्हेड, मनीष दराडे, चंद्रकांत मगर, अनिकेत बांगर व इतरांना सोबत घेऊन त्या विहिरीत एक दोरी सोडली. मद्यपी राजारामने ती कंबरेला बांधली व वर जमलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी दोरीच्या साह्याने त्याला बाहेर काढले. 

मद्यपी रुग्णालयातून पहाटेच फरार
मद्यपीच्या डोक्यावर मार लागल्याने रक्त येत होते. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री पोलिसांना माहिती देणारा अरविंद वाढे हा गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास मद्यपीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला असता मद्यपी पहाटेच फरार झाल्याचे वाढे यांनी सांगितले.

प्राण वाचवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक 
विहिरीत पडलेल्या मद्यपीचे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचवल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT