krishna 
मराठवाडा

कोरोनामुळे घरोघरी बनले गोकूळ, सजला कृष्ण अन् नटली राधा...

गणेश पांडे

परभणी ः श्रावण महिन्यातील कृष्ण जन्माष्टमीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे या सणाच्या आनंदात विरजन पडले असले तरी, घरोघरी हा सण तितक्याच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ऐरवी कृष्णरुप सज्जाच्या स्पर्धा या दिवशी आयोजित केल्या जातात. परंतू यंदा कोरोना संसर्गामुळे या कार्यक्रमांना ब्रेक लागला असला तरी मातेच्या ममत्वाचा मात्र ब्रेक नसल्याचे दिसून आले. घरोघरी चिमुकल्यांना सजवून फोटोसेशन करण्यात त्यांच्या यशोदा (आई) मग्न असल्याचे दिसून आले.

सर्वत्र (ता.१२) ऑगस्टला दहीहंडीचा सण साजरा होणार आहे. मात्र यंदा कोरोना विषाणु संकटामुळे या उत्साहावर पाणी पडले आहे. त्यामुळे शहरातील दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मंदिर देखील बंद आहेत. त्यामुळे घरच्या घरी पूजा करुन यंदा गोकुळाष्टमी साजरी करावी लागली. 

चिमुकल्यांना घरातच कृष्णासारखे सजविले...
कृष्ण हे सर्वांचे लाडके दैवत आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त लहान मुलांना, मुलींना कृष्णाचा पारंपरिक पोशाख घालून सजवले जाते. तर मुलींना राधाच्या रुपात नटवले जाते. या मुलांमध्ये बाळ कृष्णाचे रुप पाहून त्यांची पूजा केली जाते. पंरतू यंदा या सर्वच गोष्टी जश्याच्या तश्याच राहिल्या. परंतू, आईच्या ममत्वाला कधीच खंड पडत नाही. संचारबंदी असल्यामुळे घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे शहरातील अनेक महिलांनी त्यांच्या चिमुकल्यांना घरातच कृष्णासारखे सजवून कृष्णाजन्माष्ठमी साजरी केली. अनेकांनी तर मुलांना सजविल्यानंतर लाडाने त्याचे फोटोसेशन ही करण्यात मग्न झाल्याचे दिसून आले. 

छायाचित्रकारांना मिळाने काम 
कोरोना संसर्गामुळे गेल्या चार -पाच महिण्यापासून छायाचित्रकारांच्या हाताला देखील काम नव्हते, या कृष्णजन्माष्ठमीनिमित्य अनेक छायाचित्रकारांना त्यांच्या हातातील जादुगिरी दाखविण्याची संधी या कारणामुळे मिळाली होती.

कृष्णासोबत राधाही सजली...
सोहळा जरी कृष्णाच्या जन्माचा असला तरी कृष्ण हा राधेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मग जन्माच्या सोहळ्यात राधा नटली नाही तर नवलच... त्यामुळे ज्यांना छोट्या मुली आहेत. त्यांनीही अगदी उत्साहात व आनंदात त्यांच्या छोट्या मुलींना राधाचा वेषभुषा करून आज तयार केले होते. हातात छोटेसे भांडे देवून तिचेही घरातल्या घरातच फोटोसेशन झाले. 

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT