MSEDCL 
मराठवाडा

आठ हजार ग्राहकांचे शंकानिरसन तर ३८ टक्के ग्राहक बनले डिजिटल, कुठे ते वाचा... 

राजेश दारव्हेकर

हिंगोली:  हिंगोलीत लॉकडाउनच्या काळात वाढीव बिल आल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महावितरणच्या हिंगोली मंडळात २७ जूनपासून सुरू केलेल्या सहा तक्रार निवारण कक्ष, पाच ग्राहक मेळावे व सात वेबीनारद्वारे आतापर्यंत सात हजार ९८२ ग्राहकांशी संपर्क साधून त्यांचे शंकानिरसन केले. त्यानंतर वीजबिलांचा भरणा वाढत असून जुलै महिन्यात ३२ हजार ४९३ वीजग्राहकांनी एकूण सहा कोटी १७ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यातील १२ हजार २८१ वीजग्राहकांनी म्हणजेच ३७.७९ टक्के ऑनलाइन पद्धतीचा वापर करत दोन कोटी ३५ लाख रुपयाचा भरणा केला आहे. 

लॉकडाउननंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंग व ग्राहकांच्या वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित व अचूक वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यास जूनपासून सुरुवात झाली. त्यानंतर वीजबिलाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या शंका समाधानासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सात हजार ९८२ सहभागी ग्राहकांना दिली माहिती... 

मंडळनिहाय आकडेवारी कार्यालयापासून ते उपविभागीय कार्यालयांपर्यंत ग्राहक मेळावे, तक्रार निवारण कक्ष व वेबिनारद्वारे सात हजार ९८२ सहभागी ग्राहकांना वीजबिलाची माहिती देण्यात आली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. जुलै महिन्यात आजपर्यंत हिंगोली मंडळातील २० हजार २११ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबील भरणा केंद्रावर जावून तीन कोटी ८२ लाख रूपयांचा भरणा केला आहे. तर १२ हजार २८१ वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करत दोन कोटी ३५ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये औंढा उपविभागातील तीन हजार २१९ वीजग्राहकांनी ५८ लाख रूपये भरणा केला.

हिंगोली ग्रामीण उपविभागात सर्वाधिक भरणा...  

वसमत उपविभागातील सात हजार ६७२ वीजग्राहकांनी एक कोटी ५६ लाख, हिंगोली ग्रामीण उपविभागातील नऊ हजार ६९९ वीजग्राहकांनी दोन कोटी ३१ लाख, कळमनुरी उपविभागातील सात हजार ८२१ वीजग्राहकांनी एक कोटी १४ लाख रूपये तर सेनगाव उपविभागातील चार हजार ८१ वीजग्राहकांनी ५८ लाख रूपये भरणा केला आहे. नजीकच्या कार्यालयास भेट द्यावी तसेच वीजबिल भरून महावितरणला करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT