file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे कॉन्टॅक्ट ट्रेसींग, चाचण्यावर भर द्या, जिल्हाधिकारी यांचे आदेश

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कॉन्टॅक्ट ट्रेसींग करणे, कोरोना चाचण्या वाढविणे, कटोन्मेंट झोन करुन कार्यवाही करणे, बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संबंधीताना दिले आहेत.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने होणाऱ्या तपासण्या व उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्यास कंटोन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात यावी. आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी व लक्षणे नसलेल्या नागरिकांची कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात करण्यात यावी. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील बाह्यरुग्ण आदेशानुसार विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची अनिवार्यपणे कोरोना चाचण्या करावी, कॉन्टॅक्ट ट्रेसींग प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी तहसीलदारांनी तालुका पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसींग पथक नेमावे. या पथकाने आरोग्य विभाग व तहसीलदारांच्या आदेशानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. 

कॉन्टॅक ट्रेसींग करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना  शासकीय विलगीकरण केंद्रात विलगीकरण करण्यात यावे विलगीकरण केंद्रातील सर्व सोयी सुविधा करण्यासाठी तहसीलदारांमार्फत नियोजन करावे. तसेच आवश्यकतेनुसार सोयी सुविधांसाठी तहसीलदारांनी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य घ्यावे, आरोग्य विभागामार्फत बस व रेल्वे स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात यावी. कोरोना रुग्ण आढल्यास उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. यानुसार जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या संबंधित अधिकारी यांनी कार्यवाही करण्यास सुरुवात करावी असे आदेश दिले आहेत. आदेशाची आवज्ञा करणाऱ्यावर भारतीय संहितेनुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल , याची नोंद घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT