Soyabeen vikri.jpg 
मराठवाडा

एका पॉझिटीव्हमुळे मोंढा बाजार झाला निगेटीव्ह

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नसल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजार बुधवारी (ता.१५) सुरु झाला होता. या काळात साडेसात हजार क्विंटल हळदीची आवक झाल्याने शेतकरी सुखावले होते. परंतु बुधवारी (ता. २२) पिरबुन्हाणनगरमध्ये एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळताच भितीपोटी बाजारातील आवक बंद झाली.

२३ दिवसानंतर उघडला बाजार
‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील धान्य खरेदी - विक्री प्रशासनाने बंद केली होती. यानंतर काही दिवस बंद राहिलेला नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार ता.१३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. तब्बल २३ दिवसानंतर बाजारात आवक सुरु झाली होती. या काळात दररोज शेतमालाच्या दीडशे गाड्या नवा मोंढा बाजारात येत होत्या. 

सहा दिवसात सातेसात हजार क्विंटल हळदीची आवक
ता. १५ ते ता. २१ एप्रील दरम्यान सात हजार ६६८ क्विंटल हळदीची आवक झाली. तसेच सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर आदी शेतमालही मोंढा बाजारात येवू लागला. यामुळे खरेदीदार, अडते तसेच शेतकरी बाजारात सामाजीक अंतर राखुन व्यवहार करताना दिसत होते. अडत्यांकडून स्वच्छतेचे नियम पाळून सॅनिटायझर, साबण आदींच्या माध्यमातुन हात धुण्याचे काम शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी करत होते. परंतु बुधवारी (ता. २२) सकाळी जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरातील पिरबुऱ्हाणनगरमध्ये आढळून येताच, बाजार बंद झाला. रस्त्यांची अडवणुक झाल्याने शेतमालही शेतकऱ्यांच्या घरातच राहिला. परिणामी पुन्हा एकदा बाजाराला कुलूप लागले. 

जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश पोलिसांकडून पायदळी
शेतकऱ्यांची खरीपपूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शेतीविषयक आस्थापना, दुकाने, कृषि उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. या अस्थापणा सकाळी सात ते सांयकाळी सात पर्यंत चालू ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे. परंतु शुक्रवारी (ता. २४) पोलिसांनी दुपारी एक वाजता बाजार बंद करायला लावल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी. ए. संगेकर यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी एक वाजता बाजार बंद
नवा मोंढ्यातील बाजारात २३ दिवसानंतर आवक सुरु झाली होती. परंतु बुधवारी (ता. २२) कोरोना रुग्ण आढळून आल्याने बाजारातील आवक बंद झाली. यानंतर शुक्रवारपासुन सकाळी सात ते सांयकाळी पाचपर्यंत बाजार सुरु राहिले असे आदेश मिळाले. परंतु शुक्रवारी पोलिसांनी दुपारी एक वाजता बाजार बंद केला.
- डी. ए. संगेकर,

सचिव, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT