latur.jpg 
मराठवाडा

Video : लातूर : विहिरीमध्ये गणेश विसर्जनाला मज्जाव!

सुशांत सांगवे

लातूर : दरवर्षी गणरायाचे विसर्जन विहिरी, तलावात केले जाते; पण यंदाच्या भीषण दुष्काळामुळे विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरीत केवळ एक-दोन फूट पाणी शिल्लक आहे. म्हणून अशा विहिरींभोवती पडद्याचे कुंपण उभारून विहिरी झाकण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पाण्यात विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करा, असे आवाहन लातुरातील गणेश मंडळांना करण्यात आले आहे. या आवाहनाला सर्वच गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लातुरात यंदा प्रथमच मूर्तीचे विसर्जन होणार नाही.

लातुरात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा आणि धनेगाव मधील प्रकल्प कोरडे पडत आहेत. भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर लातुर उभा आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आणि महापालिकेने मूर्ती पाण्यात विसर्जन करण्याऐवजी ती दान करा, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला शहरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. त्यामुळे प्रशासनाने विसर्जन स्थळी मंडळांना आणि घरगुती मूर्तींना आपली मूर्ती दान करण्यासाठी स्टॉल उभारले आहेत.

इथे होणार मूर्ती दान

- सिद्धेश्वर मंदिर
- कव्हा तलाव
- बांधकाम भवन मागील विहिरीजवळ
- शासकीय कॉलनीतील विहिरीजवळ
- आर्वी रस्त्यावरील विहिरीजवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT