मराठवाडा

पाणी न सोडल्यामुळे कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर

प्रकाश बनकर

औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार) पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता हेमंत कोल्हेना घेराव घालत जाब विचारला.

सिडको-हडकोतील 28 वार्डाला सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवरून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी दररोज 32 एमएलडी पाण्याची गरज भासते. मात्र टाकीत केवळ पंधरा ते वीस एमएलडी एवढेच पाणी पुरवण्यात येते. रविवारी सिडको, हडकोतील बहुतांश भागात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. ऐन दिवाळीच्या दिवशी पाणी न आल्यामूळे नागरिकांनी नगरसेवकांना भंडावून सोडले. नागरिकांच्या रोषाला समोरे गेलेले नगरसेवक नितीन चित्ते व इतरांनी रविवारी सकाळी आठ वाजेपासून सिडकोतील पाण्याच्या टाकीचे गेट बंद करीत टॅंकरने होणारा पाणी पुरवठा बंद पाडला.

या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले, पाणी पुरवठा अभियंता हेमंत कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महापौरांनी सोमवारी या प्रश्‍नी महापालिका आयुक्‍तांसोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. भाजपचे नगरसेवक, नितिन चित्ते, बालाजी मुंढे, प्रशांत देसरडा, माधुरी अदवंत, पुष्पाताई रोजसकर, माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक दिलीप थोरात, आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पाण्याच्या टाकीजवळ येत कार्यकारी अभियंता हेंमत कोल्हे यांना पाण्याविषयी विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी येथे ठिय्या आंदोलन केले. कोल्हे यांनी पाणी पुरवठा सुरळीत केल्यानंतर नगरसेवकांनी माघार घेतली.

पाणी नाही कसला वाढदिवस साजरा करताय.... 
भाजप नगरसेवक नितीन चित्ते यांचा आज वाढदिवस आहे. याच दिवशी पवननगर परिसरात पाणी पुरवठा न झाल्यामूळे संतप्त झालेल्या तीसहून अधिक महिलांनी पहाटे सहा वाजता नगरसेवक नितीन चित्ते यांच्या घरी धडक दिली. पाणी नाही कसला वाढदिवस साजरा करताय असा संतप्त सवाल उपस्थितांनी केला. त्यामुळे सकाळपासून नितीन चित्ते यांनी सिडको एन- पाचच्या पाण्याच्या टाकीचे गेट बंद करत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT