Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli : ऐन दिवाळीच्या दिवसांत भावात झाली घसरण

झेंडू फुलांची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : दिवाळी सणाला वसु बारसेने सुरवात झाली. त्यानंतर धनत्रयोदशी व सोमवारी लक्ष्मीपूजन असल्याने रविवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. महात्मा गांधी चौक ते गणपती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी झेंडूच्या फुलांचे ढिगारे लावले होते. आवक वाढल्याने भावात घसरण झाली. दसऱ्याला चाळीस रुपये विकणारी फुले पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे विकली.

दिवाळीच्या सणात येणाऱ्या लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व असल्याने या दिवशी घराला आ़ंब्याचे तोरण, झेंडूच्या फुलाच्या माळा तसेच घरात असलेल्या देवदेवतांच्या फोटोला फुलांचे हार, दुचाकी, चारचाकी वाहनालादेखील पुष्पहार लावले जातात. घरोघरी लक्ष्मी पूजन केले जाते; तसेच व्यापारीही प्रतिष्ठानात लक्ष्मी पूजन करतात. यामुळे झेंडूच्या फुलांना मागणी असते.

दसरा व दिवाळी सणाला झेंडूची मागणी पाहता झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली होती. दसरा सणाला झेंडूच्या फुलांना तीस ते चाळीस रुपये भाव मिळाला होता. दिवाळीच्या सणाला मात्र भावात घसरण झाली आहे. दिवाळी सणाला फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने भाव घसरले असल्याचे झेंडू उत्पादक गजानन पवार यांनी सांगितले.

अतिवृष्टीचाही फटका

यावर्षी अतिवृष्टीनेदेखील झेंडूचे नुकसान झाले आहे. यातून वाचलेल्या झाडांना लागलेली फुले दिवाळीला विक्रीसाठी आली आहेत. यासाठी झालेला खर्च व मिळत असलेला भाव पाहता हातात काहीच पडत नसल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. शहरात रविवारी सकाळीच झेंडू विक्रेते वाहनातून फुले घेऊन आले होते. उशिराने आलेल्या विक्रेत्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी बसावे लागले. यामुळे महात्मा गांधी चौकासह शहरातील अकोला रस्ता, सदर बाजार, भाजीमंडई, अकोला बायपास, खटकाळी बायपास, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, रिसाला बाजार आदी ठिकाणी विक्रेत्यांनी झेंडू विक्रीसाठी स्टॉल उभारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT