file photo 
मराठवाडा

लॉकडाऊनच्या काळात गावठी दारुचा महापूर

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी दारु, बिअरबार तसेच परमिटरुम बंद केल्याने तळीरामांनी गावठी दारुकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे गावठी दारुचा महापूर जिल्ह्यात वाहत आहे. मुखेड तालुक्यातील कोटग्याळवाडी तांडा येथे एकाच दिवशी पाच ठिकाणी धाड टाकून मुक्रमाबाद पोलिसांनी ४२ हजार रुपये किमंतीची मोहफुलाची गावठी दारु जप्त केली. ही कार्यवाही गुरुवारी (ता. नऊ) सकाळी सहा ते साडेसातच्या सुमारास केली.

पाच ठिकाणी टाकली धाड
कोटग्याळवाडी तांडा येथे यापूर्वीही पोलिसांनी गावठी दारुची भट्टी उध्वस्त केली होती. या नंतरही पुन्हा मोहफुलाची गावठी दारु गाळण्याचा उद्योग सुरु केल्याचा सुगावा पोलिसांनी लागला. यामुळे गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजता केलेल्या कारवाइत आरोपींनी दहा हजार रुपयांची गावठी दारु बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनाही त्याच तांडावर घडली. साडेसहा वाजता अकरा हजाराची गावठी दारु पोलिसांनी जप्त करुन गुन्हा दाखल केला. ह

एकाच तांडावर दोनवेळा कारवाइ
तिसऱ्या घटनेत सकाळी सव्वासात वाजता साडेदहा हजाराची मोहफुलाची गावठी दारु जप्त केली. या प्रकरणी फौजदार गोपीनाथ वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथी घटनाही याच तांडावरील घडली. पोलिसांनी धाड टाकून साडेपाच हजाराची गावठी दारु जप्त केली. पाचव्या घटनेत सकाळी सात वाजुन वीस मिनीटाला पोलिसांनी धाड टाकून पाच हजाराची गावठी दारु पकडली. या प्रकरणी सपोनी श्री गड्डीमे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. 

मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
या पाच प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक कलमाकर गड्डीमे, फौजदार गोपीनाथ वाघमारे व जमादार नागनाथ सुर्यतळ यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस जमादार श्री सुर्यतळ, श्री. आडेकर करीत आहेत.

खात्यातील ३८ हजार पळविले
भारतीय स्टेट बॅंकेच्या तरोडा बुद्रुक शाखेतून एका कर्मचाऱ्याच्या खात्यातील ३८ हजार ६४१ रुपये (ता. २२) मार्च ते (ता. २६) मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने काढल्याचा प्रकार घडला आहे. या बाबत दीपनगर येथील दयानंद रामराव मोरे या कर्मचाऱ्याने भाग्यनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एल. एन. बोनवाड करीत आहेत. 

पंधरा हजाराची देशी दारु पकडली
मुखेड जवळील हॉटेल चंद्रमा बारजवळ एका माळावर विनापरवाना विक्रीसाठी साठविलेली पंधरा हजार ६८० रुपयांची देशी दारु पोलिसांनी गुरुवारी दुपारी चार वाजता धाड टाकून पकडली. या प्रकरणी सहायक फौजदार गोविंद मुंडे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

SCROLL FOR NEXT