औरंगाबाद ः स्त्रीरोग तज्ज्ञांच्या परिषदेचे शनिवारी उद्‌घाटन झाले. यावेळी उपस्थित डॉ. कानन येळीकर, डॉ. प्रवीण सूर्यवंशी डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. जयश्री मोरे आदी.
औरंगाबाद ः स्त्रीरोग तज्ज्ञांच्या परिषदेचे शनिवारी उद्‌घाटन झाले. यावेळी उपस्थित डॉ. कानन येळीकर, डॉ. प्रवीण सूर्यवंशी डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. जयश्री मोरे आदी.  
मराठवाडा

गरोदरपणातील रक्तदाबाचे लवकर निदान आवश्यक

योगेश पायघन

औरंगाबाद- गरोदरपणातील रक्तदाबाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे; कारण 15 टक्के महिलांना गरोदरपणात रक्तदाब असतो. त्याचे लवकर निदान झाले तर संभाव्य बालमृत्यू, मातामृत्यू टाळणे शक्‍य आहे, असा प्रातिनिधिक सूर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या परिषदेत शनिवारी (ता.14) पहिल्या दिवशी निघाला.

प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना औरंगाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि एमजीएमतर्फे पदव्युत्तर डॉक्‍टरांसाठी एमजीएमच्या द्योतन सभागृहामध्ये या दोनदिवसीय परिषदेचे शनिवारी उद्‌घाटन झाले. यात डॉ. रागिनी वर्मा म्हणाल्या, ""उपचारासंदर्भात नवनवीन मार्गदर्शक तत्त्वे येत असतात. या तत्त्वानुसार डॉक्‍टरांनी उपचार केले पाहिजे,'' असे सांगितले.

डॉ. महेश तांदळे यांनी गर्भातील शिशूची अनेक कारणांनी वाढ खुंटते. त्याचे वेळीच निदान झाल्यास बालमृत्यू टळू शकतील, असे मत व्यक्त केले. यात मुंबई, नांदेड, नगर, लातूरसह विविध शहरातील डॉक्‍टरांनी सहभाग नोंदविला. उद्‌घाटनप्रसंगी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. पी. एम. जाधव, डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मोरे, डॉ. स्वाती शिरडकर, डॉ. रागिनी वर्मा, डॉ. अशोक आनंद, डॉ. गुरप्रीत कौर, डॉ. लक्ष्मी राजकोंडा, डॉ. रुपाली गायकवाड, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. वर्षा देशमुख उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT