Arjun Khotkar
Arjun Khotkar 
मराठवाडा

अर्जुन खोतकरांना ED चा दणका, शिवसेनेची कोंडी वाढली

सकाळ वृत्तसेवा

जालना - रामनगर (ता. जालना) येथील जालना सहकारी साखर कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीन जप्त करण्यात आल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ट्विटद्वारे आज दिली. या कारवाईमुळे शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Ajun Khotkar ED Raid)

जालना सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा लिलावाशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने आज कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीन आदी जप्त केली असल्याची माहिती ‘ईडी’ने दिली. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी या साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

त्यानंतर ‘ईडी’च्या पथकाने २६ नोंव्हेबर २०२१ ला खोतकर यांच्या निवासस्थानी, तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जालना साखर कारखाना या ठिकाणी दोन दिवस छापे घातले होते. शिवाय खोतकरांची चौकशी केली होती. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये रामनगर येथील जालना साखर कारखन्याची मालमत्ता, जमीन आणि यंत्रसामग्री विक्री करण्यास परवानगी देऊ नका, असे पत्र ‘ईडी’कडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT