Accident News esakal
मराठवाडा

Accident News : आयशर शिवशाही बसचा अपघात ; २ गंभीर जखमी, २१ प्रवासी किरकोळ जखमी

शिवशाही बस चालक के.टी.देशमुख, वाहक जी.एल.नेहवाल यांच्यासह इतर जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सिंदखेड राजा : छत्रपती संभाजी नगर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किनगांव राजा ता.सिंदखेड राजा गावाजवळ रात्री ९.३० च्या दरम्यान आयशर व शिवशाही बसचा अपघात होऊन २ जण गंभीर जखमी असून शिवशाही बस मधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की शिवशाही बस क्रमांक एम.एच ०९ ई. एम.२१२५ ही छत्रपती संभाजीनगर वरून रिसोडला जात होती तर आयशर क्रमांक एम.एच २० ई.जी ८८११ मेहकर वरून छत्रपती संभाजीनगरला जात होते.

किनगांव राजा जवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ दोन्ही वाहनाचे समोरासमोर धडक होऊन आयशर चालक अरमान एस.शेख रा.छत्रपती संभाजीनगर हे जबर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पुढील उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.शिवशाही बस चालक के.टी.देशमुख, वाहक जी.एल.नेहवाल यांच्यासह इतर जखमी झाले आहेत.

शिवशाही बस मध्ये एकुण २० ते २१ प्रवासी प्रवास करत होते. सिंदखेड राजा जवळ नालासोपारा वाशिम ही बस ब्रेकडाऊन झाली असल्यामुळे या बसमधील ७ ते ८ प्रवासी सुध्दा बसमध्ये होते.अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विनोद नरवाडे, पोलीस कर्मचारी विष्णू मुंढे,शरद ठोंबरे,शिवाजी बारगजे, मिलिंद सोनपसारे,नाजीम चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT