file photo 
मराठवाडा

Video : सायरन वाजवून पोलिसांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा....

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे यंदाची रमजान ईद मुस्लिम बांधवांना सोमवारी (ता.२५) घरातच साजरी करावी लागली. घरात थांबून प्रशासनास सहकार्य करणाऱ्या शहरातील मुस्लिम बांधवांना परभणी पोलिस दलाच्यावतीने सायरन वाजवून शहरात प्रत्येक भागात फिरून जाहीर शुभेच्छा देण्यात आल्या.

परभणी जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेले ३६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयात सोशल डिस्टसिंगचा योग्य वापर व्हावा व कोरोनाचा कुणालाही संसर्गा होऊ नये यासाठी परभणी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्यावतीने मुस्लिम बांधवांना रमजान ईद आप-आपल्या घरात साजरी करावी तसेच मुख्य नमाज पठणही घरातच करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार परभणी शहरातील मुस्लिम बांधवानी सोमवारी (ता.२५) सकाळी ईदच्या मुख्य नमाज पठणासांठी बाहेर जाणे टाळले. शहरातील सर्वच मुस्लिम बांधवानी स्वताच्या घरात राहूनच ईदची नमाज पठण केले. तसेच एकमेकांना शुभेच्छा ही सोशल मिडिया, व्हिडिओ कॉल व इतर माध्यमातून दिले. एरवी नमाज पठणानानंतर गल्ली - बोळातून व रस्त्यावर मुस्लिम बांधव फिरत एकमेकाना शुभेच्छा असत मात्र, यंदा प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत कुणीही बाहेर पडले नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.

पोलिसांनी शहरात फिरून दिल्या शुभेच्छा
परभणी पोलिस दलाचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शक्कल लढविली. त्यांनी शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा फौजफाटा फिरवून मुस्लिमबांधवांना शुभेच्छा दिल्या. परिसरात पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवित फिरत होत्या. त्याच बरोबर गाडीवरील ध्वनीक्षेपणावरून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जात होता. मुस्लिम बांधवांनी देखील त्या परिसरात गाड्या गेल्यानंततर घराच्या दारात, खिडकीत येवून पोलिसांच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

 

रमजान ईदच्या शुभेच्छा
कोरोना विषाणु संसर्गानंतर पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहानाला मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद दिल्या बद्दल त्यांचे पोलिस प्रशासन आभार व्यक्त करत आहे. सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा.
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधीक्षक, परभणी शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Maglev Bullet Train: विमानालाही टाकले मागे! ५ सेकंदात ८०० किमी प्रति तास वेग; चीनच्या 'मॅग्लेव' ट्रेनचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Sangli Miraj Expansion : कुठे वाढणार महापालिकेचा विस्तार? तीनही शहरांचे केंद्र बदलले; 'या' भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडणार?

SCROLL FOR NEXT