Barav
Barav Sakal
मराठवाडा

Barav on Post Card : डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर झळकणार महाराष्ट्रतील आठ बारव

विलास शिंदे

सेलू - वालूर (ता. सेलू) येथिल चक्राकार बारव (स्टेपवेल) टपाल तिकिटावर उमटल्यानंतर आता डाक विभागाने बारवांचा वारसा, संवर्धन आणि त्या संदर्भातील माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी वास्तु शास्त्रीय आरेखन पूर्ण झालेल्या राज्यातील आठ बारवांची नोंद घेतलेली पुस्तिका प्रकाशीत केली आहे.

राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित साधून हे माहिती पुस्तिका मुख्य पोस्ट मास्तर जनरल (महाराष्ट्र क्षेत्र) के. के. शर्मा आणि पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी बुधवारी प्रकाशित केली आहे. त्यामध्ये राज्यातील आठ बारवांचा समावेश आहे. त्यातही चार बारवा या मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील आहेत हे विशेष अशी माहिती महाराष्ट्र संवर्धन मुलींचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर (चौकोनी बारव) या बारवांची माहिती पुस्तिकेत नोंद आहे. या अन्य बारवात अमरावतीतील महिमापुर, साताऱ्यातील बाजीराव विहीर, पुण्यातील मंचर आणि नाशिक मधील गिरणारे येथील बारवांचा समावेश आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी सहकार्यासह बारव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.

अनेक नामशेष आणि बुजलेल्या बारबांचा शोधही या मोहिमेतून लावण्यात आला आहे. वास्तुशास्त्र आणि जल स्तोत्राचा वारसा सांगणाऱ्या दोन हजार बारवांच्या संवर्धनाचे काम लोकसहभागातून हाती घेऊन राज्यातील दोन हजार बारवांची अचूक ठिकाणे नकाशावर आणली आहेत.

राज्यातील दोन हजार बांरवांची माहिती 'इंडियन स्टेप वेल्स' या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हेलिकल, एल. झेड. आकार, शिवपिंडी आकार, चौकोनी, आयात कृती आकारातील विविध वास्तू स्वरूपातील या बारव आहेत. परंतु त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

आम्ही टपाल सेवा यांचे आभारी आहोत. आणि यामुळे लोकसभागातून होणाऱ्या बारवांच्या जतन, संवर्धन आणि पुनर्जीवनाच्या प्रयत्नांना आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल.

- रोहन काळे, बचत मोहीम संस्थापक.

परभणी जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय अभिमानाची आहे. ऐतिहासिक वारसा स्थळ असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचा पुरुषाथाचा हा विजय आहे. बारवा, प्राचीन मंदिराकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची जपवणूक करा.

- मल्हारीकांत देशमुख, बारव मोहीम परभणी प्रमुख

वालूर येथील बारवांचे काम लोक सहभागातून करण्यात आलेले आहे. यापुढे पायाभूत सुविधासाठी शासनाकडून पर्याप्त निधी मिळणे गरजेचे आहे. वालूरला जागतिक स्तरावरील एकमेव हेलिकल स्टेपवेल बारव आहे.

- संजय साडेगावकर, शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल, बचाव समिती वालूर प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT