maharashtra politics 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्याला दोन मंत्रिपदाची अपेक्षा

जिल्ह्यात शिवसेना बंडखोर आमदारांमध्ये प्रा. तानाजी सावंत यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर

सयाजी शेळके :

उस्मानाबाद : जिल्ह्यात शिवसेना बंडखोर आमदारांमध्ये प्रा. तानाजी सावंत यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्याची कट्टर समर्थक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही भाजपच्या कोट्यातून नाव घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. चार पैकी तीन आमदार आणि एक खासदार जिल्ह्याने सेनेला दिला आहे. मात्र या तीन पैकी दोन आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. यामध्ये परंडा विधानसभेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचा पवित्रा कायमच आक्रमक राहिलेला आहे. शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी शिवजलक्रांतीच्या माध्यमातून विकास कामे खेचून आणली. मात्र महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात प्रा. सावंत यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून सातत्याने कोणत्या-ना कोणत्या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षावर उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली.

शिवाय भाजपसोबत युती करावी असा आग्रहही त्यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याच्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून येत होत्या. मात्र गेली अडीच वर्षात नाराज असलेली आमदार प्रा. सावंत यांनी या बंडामध्ये प्रमुख भूमिका निभवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेवले तर ते पुन्हा उघडपणे बोलायला कमी करणार नाहीत, याची धास्ती ही शिंदे गटाला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद हे निश्चित मानलं जात आहे.

तर दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत आमदार पाटील यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनाच त्या परिस्थितीत आव्हान दिले होते. त्यामुळे खासदार पवार यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. हे सर्वश्रुत असल्याने आमदार पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबत चांगली जवळीक साधली आहे.

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नाही. त्यामुळे आमदार पाटील यांना बळ देण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यातून होत आहे. जिल्ह्यात केवळ चारच आमदार आहेत. अगदी छोटा जिल्हा असला तरी या ठिकाणातून दोन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू झाली आहे. प्रा. सावंत फडणवीस मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री होते.

महाविकास आघाडीत त्यांना स्थान मिळाले नाही. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार पाटील युतीला बहुमत मिळूनही मंत्रिपदापासून दूर राहिले. त्यांचे पक्षांतर फसल्याची चर्चा होती. आता तरी त्यांचे पक्षांतर फळाला येईल का, यासाठी कार्यकर्ते मोठे आशेने पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT