भागवत जाधव 
मराठवाडा

भोकरदन तालुक्यात विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : घराजवळील विद्युत खांबाला (Electric Shock) लावलेल्या लोखंडी ताराच्या ताणात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. या ताराला स्पर्श झाल्यामुळे विजेचा जोरदार धक्का लागल्याने भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील पेरजापूर येथील तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.18) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. भागवत नामदेव जाधव (वय 25) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील (Jalna) पेरजापूर येथील भागवत जाधव हा कुटुंबियांसह गावात राहतो. शुक्रवारी (ता.17) तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

भागवत याच्या घरातील वीजपुरवठा देखील खंडित झाल्यामुळे घराजवळ असलेल्या विद्युत खांबावरून आलेले विजेच्या तारात काही अडचण आहे का हे पाहण्यासाठी भागवत हा शनिवारी सकाळी विद्युत खांबाजावळ गेला. यावेळी खांबाला ताण म्हणून लावलेल्या लोखंडी तारात पावसाच्या पाण्यामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. या ताणाला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्याने त्याला तातडीने जखमी अवस्थेत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे तपासून त्याला मृत घोषित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी एक वाजता पेरजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT