file photo 
मराठवाडा

शारीरिक पोषण, व्यायामावर भर द्यावा; कोरोनातून बरे झाल्यानंतर गाफील राहू नका ; डॉक्टरांचा सल्ला

विनोद पाचपिल्ले

जिंतूर ः कोरोनावर मात करुन बरे झाल्यानंतरही गाफील राहून चालणार नाही तर अशा नागरिकांनी शारीरिक पोषण व व्यायामावर भर द्यायला हवा. विशेषतः दुर्धर आजाराच्या रुग्णांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही शारीरिक शोषण गरजेचे आहे. व्यायाम, सकस आहार, प्राणायाम, योगासने या बाबत मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रोज किमान दोन वेळेस प्राणायाम, योगासने करण्याच्या सूचना रुग्णांना दिल्या जातात. 

कोरोनाच्या मुक्तीनंतर पुरेशी झोप घ्यावी तसेच पौष्टिक आहार सुद्धा रुग्णांनी घ्यावा व तणावमुक्त रहावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आहे. कोव्हिड झालेल्या रुग्णांना योगासन महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होतात. आणि मानसिक ताणही सुद्धा कमी होतो. कोरोनातून बरे होऊनही तीन महिन्यानंतर एखाद्या शहरातील अँटीबॉडीज नाहीशा होऊ शकतात अशा व्यक्ती जर बाधितांच्या संपर्कात आल्या तर त्यांना पुन्हा कोरोणाची लागण होऊ शकते.

नियमित योगासने करावे ः डॉ. रविकिशन चांडगे
ज्या व्यक्तींना कोरोना झाला असेल अशा व्यक्तींनी २८ दिवसानंतर लस घेणे आवश्यक आहे. एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही असे म्हणून गाफील राहू नका. तर सोशल डिस्टंसिंग मास्कचा वापर नियमित करावा.

रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे ः डॉक्टर योगेश दहिफळे
ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला असेल अश्या रुग्णांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाली असते. त्यामुळे त्यांनी कपालभारती, अनुलोम-विलोम यासारखे योगासनाचे प्रकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे श्वसनचा त्रास कमी होऊन त्यांचे मानसिक आरोग्य स्वस्थ राहते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भ्रमरी योगासनाचा प्रकार नियमित रुग्णांनी करायला हवा. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT