Employment Guarantee Scheme sakal
मराठवाडा

Phulambri News : रोजगार हमी योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार जन सुनावणी

रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरी व गाय गोठ्याचे कुशल बिले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी शेतकऱ्याकडे होत आहे.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरी व गाय गोठ्याचे कुशल बिले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी शेतकऱ्याकडे होत असल्याचे तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी केली होती.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फुलंब्री पंचायत समितीत जन सुनावणी बुधवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता केली जाणार असल्याचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील कुशलचे बिले अडकलेल्या शेतकऱ्यांना उपस्थित राहावे असे आवाहन माझी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी केले आहे.

फुलंब्री तालुक्यात सुमारे अकराशे गाय गोठे व 700 विहिरीचे काम झालेले आहे. या कामात कुशलचे बिल काढण्यासाठी रोजगार हमी योजना विभागातील अभियंते मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करतात. पैसे दिल्याशिवाय कुशल कामाचे बिल काढले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत होती.

त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सदरील कामे मार्गी न लागल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी पंचायत समितीच्या कार्यालयात जन सुनावणी ठेवले आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कुशलचे बिले अद्याप मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांनी पंचायत समितीत हजर रहावे असे आवाहन माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी केले आहे.

फुलंब्री तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे कुशल कामाचे बिल काम करूनही निघालेले नाही. ज्यांच्याकडे कुशल कामासाठी पैशाची मागणी होते. परंतु काम कुशलचे बिल मिळत नाही. अशा शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे.

- किशोर बलांडे, माजी सभापती, अर्थ व बांधकाम जि.प. संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT