file photo 
मराठवाडा

घरात घुसले, पाणी पीले आणि वृद्धेचा...

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी तालुक्यातील शिरुर येथे अज्ञात आरोपीने एका वृद्धेचा गळा चिरुन जवळपास एक लाख रुपये सोन्याचे दागिने लुटले. ही घटना मंगळवारी (ता. २५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे घडली. घटनेची माहीती मिळताच धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी. शेवाळे यांनीही घटनेची महिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

कृष्णाबाई पुंडलीक पडोळे (वय ८५) रा. शिरुर ह्या शिरुर गावात जिल्हा परिषदेच्या पाठीमागे आपल्या घरात एकटी राहत होती. मंगळवारी (ता. २५) दुपारी अज्ञात आरोपी कृष्णाबाई पडोळे यांच्या घरात जबरीने घुसले. यावेळी श्रीमती पडोळे यांना त्यांनी पाणी मागितले. घरात बसले तिच्याशी गप्पा केल्या. त्यानंतर तिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिच्या कनातील व गळ्यातील सोन्याचे दागिणे लुटले. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट

सायंकाळी उशिरा शेजाऱ्यांना हा पत्ता लागला. त्यांनी घरात डोकावून पाहिले तर कृष्णाबाई हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी उमरी पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी. शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आपले वरिष्ठ धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांना कळविले. त्यांनीही घटनास्थळ गाठले. कृष्णाबाई यांचा मृतदेह उमरीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला. 

उमरी पोलिस ठाण्यात खून व लुटमारीचा गुन्हा

कृष्णाबाई हिच्या मृतदेहावर बुधवारी (ता. २६) दुपारपर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती. या प्रकरणी साईनाथ पडोळे यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात खून व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शेवाळे करत आहेत. या घटनेमुळे या गावात भितीचे वातावरण पसरले असून मारेकऱ्याच्या शोधात पोलिस पथक तैणात केल्याचे डीवाएसपी सुनिल पाटील यांनी दिली. मयत वृध्देस विवाहित पाच मुली असुन त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे काही वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT