बिरूदेवाच्या पालखी मिरवणूकीत भाविकांचा उत्साह sakal media
मराठवाडा

बिरूदेवाच्या पालखी मिरवणूकीत भाविकांचा उत्साह

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला असंख्य भाविकांची उपस्थिती ; बाशिंग चढविण्याचा नेत्रदिपक सोहळा

अविनाश काळे

उमरगा: कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या उमरगा-लातूर महामार्गावरील श्री क्षेत्र बिरुदेव मंदिराच्या यात्रेत कोरोनानंतरच्या काळात हजारो भाविकांची उपस्थिती दिसून आली. शुक्रवारी (ता. पाच) सांयकाळी धनगरवाड्यातून निघालेल्या श्रीच्या पालखी मिरवणूकीत ढोलाचा गजर, भंडाऱ्याची मूक्तपणे उधळण करत बिरूदेवाचा जयघोष करण्यात आला.

कोरोना संसर्गामुळे गुढीपाडवा आणि गत दिवाळी पाडव्याच्या पारंपारिक पद्धतीच्या यात्रेवर निर्बंध आले होते. यंदा कोरोनाचे नियम कांही प्रमाणात शिथील करून मंदिर प्रवेशाची संधी असल्याने श्री. क्षेत्र बिरुदेव मंदिराच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी ( ता. चार) सांयकाळी पाच वाजता बिरुदेव मंदिर परिसरातून निघालेल्या पालख्या शहरातील श्री. ग्रामदैवत महादेव मंदिरास भेट घेतल्या. तेथून धनगरवाड्यातील लक्ष्मी मंदिरात पालख्याचा मुक्काम होता. शुक्रवारी (ता.पाच) पाडवा सणानिमित्त दुपारी चार वाजता धनगरवाड्यातून श्री च्या काठी व पालखीच्या सवाद्य मिरवणूकीत धनगर समाज बांधवांनी ढोलाच्या तालावर अनेक कसरतीचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पालखी मिरवणुक वेशीत आल्यानंतर मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर पालख्यांची महादेव मंदिर भेट झाल्यानंतर प्रवेशद्वारावर मंदिराचे पुजारी जयराम म्हेत्रे व भास्कर घोडके यांनी येणाऱ्या काळातील पीक - पाण्याची भविष्यवाणी सांगितली. आई - वडिलाची सेवा नित्यनियमाने केली पाहिजे, माणूसकी जपण्याचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. असा संदेश दिला. सायंकाळी सात वाजता हुतात्मा स्मारकाजवळील पुलाजवळ आरती झाल्यानंतर पालख्यांचे बिरुदेव मंदिराकडे प्रस्थान झाले. सखाराम भातागळे, महावीर कोराळे, बाबुराव सुरवसे, चंद्रकांत मजगे, राजु दामशेट्टी, राम पौळ, राजेंद्र सूर्यवंशी, किशोर शिंदे, सचिन शिंदे, दिनेश शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

बाशिंग चढविण्याचा नेत्रदिपक सोहळा

पालख्या मंदिरात आल्यानंतर पाच सुहासिनी महिलांनी लक्ष्मीची ओटी भरली. त्यानंतर भंडारा आणि लोकराची उधळण व ढोलाचा गजर करीत शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता विजापुरहून आलेले मानाचे बाशिंग बिरुबाच्या मूर्तीवर चढविण्यात आले. पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या हस्ते आरती झाली. शनिवारी (ता. सहा) पहाटे निघालेल्या छबिना मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. दुपारी मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटकासह आंध्र, तेलंगणा प्रदेशातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री बिरुदेव मंदिर देवस्थान पुजारी मंडळाचे जालिंदर सोनटक्के, माजी नगरसेवक मधुकर घोडके, एकनाथ घोडके, नगरसेवक गोविंद घोडके, बालाजी घोडके, सुभाष आष्टगे, सोपान बिराजदार, दिलीप घोडके, डॉ. किशोर घोडके, संभाजी घोडके, संतोष घोडके, सुनिल सोनटक्के, शाहू घोडके यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, पुजारी बांधवांनी यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT