Ex Army Men do Farming In Umarga
Ex Army Men do Farming In Umarga 
मराठवाडा

शेती करणाऱ्या माजी सैनिकांना रब्बी हंगामासाठी अल्पदराने कर्ज वितरण

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती व पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सेवानिवृत्तीनंतर बहुतांश माजी सैनिकांनी शेती व्यवसायाचा पर्याय निवडला. नुकत्याच झालेल्या शेती नुकसानीने हतबल झालेल्या माजी सैनिकांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी माजी सैनिक सहकारी पतसंस्थेकडुन अल्प व्याजदराने कर्ज वितरणाचा प्रारंभ सोमवारी (ता.दोन) करण्यात आला.
शहरातील माजी सैनिक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात अकरा सभासदांना प्रत्येकी पन्नास हजाराचे कर्ज रक्कमेचे धनादेश देण्यात आले.

कर्ज वितरणाचे ४५ लाखांचे उद्दिष्ट्य असून एक वर्षाच्या मुदतीत ९ टक्के व्याजदराने कर्ज परतफेड करावी लागणार आहे. दरम्यान माजी सैनिक पतसंस्थेचे ८११ सभासद आहेत. दोन कोटी २७ लाख रूपयाच्या ठेवी पतसंस्थेकडे जमा आहेत. ठेवीवरील मूळ रक्कमेवर दोन टक्के आगाऊ व्याजदराची रक्कम आणि बारा टक्के लाभांशाची रक्कम अशी एकूण २८ लाख ७७ हजाराची रक्कम दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सभासदाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

माजी सैनिकांच्या आर्थिक अडचणीसाठी पतसंस्था नेहमी मदत करीत आली आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी माजी सैनिकांना अडचण येऊ नये म्हणून पन्नास हजारांचे कर्ज देण्याचा निर्णय पतसंस्थेने घेतला. शेती करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हा हातभार महत्त्वाचा ठरणारा आहे. या वेळी पतसंस्थेचे संचालक आदिनाथ घोरपडे, विश्वंभर दासिमे, बालवीर शिंदे, वाल्मिक भोसले, सभासद हरि इंगळे, अशोक सूर्यवंशी, भास्कर बाचणे आदी उपस्थित होते.


सैन्यदलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सैनिकांच्या न्याय, हक्कासाठी संघटनेने सर्वोपतरी संघर्ष केला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी अर्थसाहाय्य केले आहे. दिवाळी सणानिमित्त लाभांशाची रक्कम जमा केली आहे. अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश माजी सैनिक शेती व्यवसाय करतात. त्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ४५ लाख कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट्य असून टप्प्याटप्प्याने कर्ज वितरण सुरू आहे.
- शहाजी चालुक्य, अध्यक्ष, माजी सैनिक सहकारी पतसंस्था


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT