शिष्यवृत्ती वाटपात गोंधळ, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा प्रताप

Osmanabad Zilla Parishad
Osmanabad Zilla Parishad

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दिलेल्या शिष्यवृत्तीमध्ये चांगलाच गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. नाव एकाचे अन् दिली दुसऱ्यालाच. खाते क्रमांक एक अन् दुसऱ्याच क्रमांकावर शिष्यवृत्ती वर्ग केल्याचे अनेक घटना घडत असल्याने जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली राहवी. गळतीचे प्रमाम कमी व्हावे. यासाठी शासनाकडून विविध उपायोजना केल्या जातात.

अनुसूचित जाती आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती वाढावी. यासाठी शासनाकडून पाचवी ते सातवी आणि आठवी ते दाहवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. तसेच अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी त्यांनाही शिष्यवृतीच्या माध्यमातून मदत केली जाते. विशेष म्हणजे अगदीच तुटपुंजी मदत असताना जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय उपस्थितीवरूनच शिष्यवृत्ती वाटप केली जाते. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहितीच या विभागाकडे नाही.

असा आहे धांगडधिंगा
तुळजापूर तालुक्यातील एका अपंग विद्यार्थीनीला शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात तिच्याकडे अपंगाचे प्रमाणपत्रच नाही. तर अन्य एका प्रकरणात समृद्धी दीपकराज जाधव हिने दिलेल्या खाते क्रमांकावर शिष्यवृत्ती वर्ग करण्याच्या ऐवजी तिसऱ्यालाच शिष्यवृत्ती दिली आहे. अगदी तसाच प्रकार सरस्वती विद्यालयात (तामलवाडी) विशाल गजानन घोडकेच्या बाबतीत घडला आहे. तर भूम येथील रविंद्र हायस्कूलच्या प्रिया माने आणि सिमरन मोघल या दोघांची एकाच खात्यावर शिष्यवृत्ती वर्ग केली आहे. मयुरी सुरेश कांदे हिच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याच्या ऐवजी मयुरी सुरेश कांबळे या दुसऱ्याच विद्यार्थीनीच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. असेच काहीसे प्रकार अन्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा धांगडधिंगा समोर आला आहे.


मूळात विद्यार्थ्यांना जेमतेम शिष्यवृत्ती मिळते. अन् त्यातही असा गोंधळ होणे चुकीचे आहे. याबाबत समाजकल्याण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो. माहिती घेऊन समाजकल्याण अधिकाऱ्यांना सूचना देतो.
- अनिलकुमार नवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.


 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com