file photo 
मराठवाडा

माजी नगराध्यक्षांना मारहाण प्रकरणी शिक्षा

बाबूराव पाटील

भोकर (जिल्हा नांदेड)ः उमरी येथील माजी नगराध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करुन गंभिर जखमी केल्याप्रकरणी चौघा जणांना तीन वर्षांची शिक्षा मंगळवारी (ता.३१) जिल्हा सत्र न्यायाधिश मुजीब शेख यांनी सुनावली आहे.

न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार उमरी यथे (ता. दोन) एप्रिल २०१३ रोजी फिर्यादी माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी हे उमरी पालिकेच्या तत्कालिन नगराध्यक्षा अनिता अनंतवार यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत त्यांना अपात्र करावे यासाठी सुनावणीस नांदेडला निघाले असता दुपारी दीड वाजता उमरी तहसील कार्यालयासमोर आरोपींनी कार आडवी लावून शिवीगाळ करुन गाडीच्या काचा फोडल्या. यातून बचाव करण्यासाठी श्री. कुलकर्णी परत उमरीकडे जाताना न्यायालयाच्या समोर आरोपींनी लाकडांनी जबर मारहाण केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन श्री. कुलकर्णी यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायाधिांनी संरक्षण देऊन उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.

उमरी ठाण्यात परस्परविरुध्द गु्न्हे

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने मंगळवारी १४ साक्षिदार तपासून आरोपी श्रीनिवास पंढरी अनंतवार, पप्पू मेश्राम सावंत, लक्ष्मण भाऊराव सावंत, शंकर मनोहर सावंत, सर्व रा. गोरठा यांना तीन वर्षांची सक्तमजूरी, सात हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. श्रीनिवास अनंतवार यांच्या फिर्यादीवरून संजय कुलकर्णी, एम. मलिकार्जून चंदापूरे, मनोज हनमंत कुलकर्णी, साईनाथ श्रीराम मुरकुटवार यांना एक वर्षाची सक्तमजूरी व तीन हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. संजय लाठकर यांनी काम पाहिले. 

न्यायाधीश शेक मजीब यांचे निकाल धाडशी

भोकर न्यायालयाचे न्यायाधिश शेख मुजीब हे बहूधा अनेक प्रकरणात सखोल अभ्यास करून आरोपींना शिक्षा सुनावतात. मागील काही वर्षातील त्यांचे निकाल अनेकांना धक्का देणारे आहेत. माजी नगारध्यक्ष हे उमरी नगररिषदेचे पहिले शिवसेना नगारध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. मात्र त्या नंतर त्यांनी शिवसेनेला जयमाहाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर व त्यांच्या काही समराथकावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या ह्ल्याच्या विरोधात यांनी माजी नगाराध्यक्षांच्या पतीला व त्यांच्या समर्थकांना माराहण केली होती. या प्रकरणाचा निवाडा मंगळवारी न्यायाधिश शेख मुजीब यांनी दिला. त्यांच्या निकालाकडे उमरी व भोकरमधील जनतेचे लक्ष लागले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT