फोटो 
मराठवाडा

शिक्षणाच्या मूल्यसंवर्धनासाठी ‘हा’ प्रयोग..

शिवचरण वावळे

नांदेड : देशातील शिक्षणाची गुणवत्ता खालच्या स्तराला जावून पोचली आहे. खालावलेली गुणवत्ता पुन्हा शाळास्तरावर रुजविण्यासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे घटनात्मक मूल्य रुजविण्यासाठीचा हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे. मुथा फाउंडेशनच्या या यशस्वी प्रयोगाची अंमलबजावणी शासन स्तरावरून सुरू आहे. 

पूणे येथील शांतीलाल मुथा हे नाव देशभरात ओळखले जाते, ते त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. तसे बघितले तर त्यांचे शिक्षण क्षेत्राचा धांडोळा घेण्यासाठी त्यांनी तीन दशकांपासून अख्खा महाराष्ट्र पायाखाली घातला आहे. त्यामुळे त्यांना एक ध्येयवेडे समाजसेवक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत मोलाचे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुण्यात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, हे त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. 

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे ‘मूल्य संवर्धन’ 
शासनाच्या वतीने त्यांनी सुरू केलेला ‘मूल्य संवर्धन’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६७ हजार शाळांमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमाची निर्मिती शांतीलाल मुथा फाउंडेशनने केली आहे. मागील सहा वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांमध्ये तो यशस्वीरीत्या राबविला जात आहे. त्याचे मूल्यमापन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांनी केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले. पुढील पाच वर्षांत शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावल्याचे दिसेल, असे शांतीलाल मुथा अभिमानाने सांगतात. 

 
प्रदर्शन, मूल्यवर्धन मेळावा 
सात जानेवारी ते ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्हास्तरीय मूल्यवर्धन मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालनानंतर तिसरा मूल्यवर्धन जिल्हास्तरीय मेळावा नांदेड जिल्ह्यातील ए. के. संभाजी मंगलकार्यालयात गुरुवारी (ता. नऊ) घेतला गेला. यात तीन दिवस प्रदर्शन व एक दिवस मूल्यवर्धन जिल्हा मेळावा असे स्वरूप आहे. शांतीलाल मुथा फाउंडेशन मूल्य संवर्धनातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे फाउंडेशनने मूल्य संवर्धनाचा सुधारित आराखडा तयार केला व तो इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका व शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार केल्या. यावर समितीद्वारे योग्य परीक्षण करून या आराखडा व अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे. सन २०१५ अखेरीस फाउंडेशनने मूल्य संवर्धन हा कार्यक्रम राज्य शासनाच्या स्वाधीन केला. तेव्हापासून गेल्या चार वर्षांत राज्य शासनाने हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वाढवत आता राज्य शासनाच्या सर्वच शाळांपर्यंत पोचविण्याचे कार्य सुरू झाले आहे.

परिवर्तनाच्या दिशेनी वाटचाल
शांतीलाल मुथा फाउंडेशन राज्य शासनाच्या या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी विनामूल्य सहकार्य करीत आहे. गेल्या चार वर्षांत या कार्यक्रमाचे पायाभूत सर्वेक्षण व मूल्यमापन अनेक वेगवेगळ्या संस्थांनी केले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेचे किती कार्यक्षम व जबाबदार आहेत, त्याचे दर्शन हे प्रदर्शन पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला येईल. काही शिक्षकांना मूल्य संवर्धनाचा अनुभव मोजक्या शब्दांमध्ये स्वेच्छेने लिहून पाठवला आहे. या सर्व यशोगाथामधून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन दिसून येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT